शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांचा सागवान माल जप्त

By admin | Updated: April 14, 2017 01:11 IST

१२ एप्रिलच्या मध्यरात्री सागवानाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आसरअल्ली वन परिक्षेत्रातील

१३ बैल, १५ बंड्या सापडल्या: आसरअल्ली वन परिक्षेत्रातील जंगलात कारवाईसिरोंचा : १२ एप्रिलच्या मध्यरात्री सागवानाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आसरअल्ली वन परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी रात्री २.३० वाजताच्या सुमारास अंकिसा येथील नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साफळा रचला. या घटनेत १० लक्ष रूपयांचे सागवान जप्त करण्यात आले आहे.१२ एप्रिलच्या रात्री २.३० वाजताच्या सुमारास आसरअल्ली वन परिक्षेत्रातील वनकर्मचारी अंकिसा येथील नदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दबा धरून होते. दरम्यान बैलबंडीत सागवान लठ्ठे भरून येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी वनकर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ३५ ते ४० च्या संख्येत असलेल्या वनतस्करांनी जोरदार दगडफेक केली. त्यावेळी आसरअल्लीचे क्षेत्र सहायक एलएम शेख यांनी त्यांच्या जवळील पिस्तूलमधून स्वसंरक्षणार्थ चार राऊंड हवेत फायर केले. सागवान तस्करांनी दगड फेक हल्ला तीनवेळा करून बैल व बंड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नऊ वनकर्मचारी घटना स्थळावर हजर होते. वनकर्मचाऱ्यांनी सागवान तस्कराचा पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये भास्कर बालाजी मक्काला रा. अंकिसा व संतोष पोचन्ना कोळी रा. लक्ष्मीदेवी पेठा यांचा समावेश आहे. उर्वरित तस्कर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यानंतर दुरध्वनीवरून सिरोंचा व आसरअल्ली वन परिक्षेत्र व फिरते पथक सिरोंचा यांना माहिती देण्यात आली. तेथील वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पकडलेले १३ बैल, १५ बैलबंडी व २८ सागवान लठ्ठे यांची पाहणी करून वन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आले. पकडलेल्या मालाची किमत १० लाख रूपये एवढी असल्याची माहिती उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)