शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गणपूर रेती घाटातून अवैध ्न्नरेती उपसा झाल्याचा अहवाल

By admin | Updated: February 14, 2016 01:23 IST

तालुक्यातील गणपूर येथील रेती घाटातून पोकलँड मशीनद्वारे अवैधरीत्या रेतीचे उत्खनन झाले असल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले ...

चौकशी समितीचे निष्कर्ष : कारवाईकडे लागले लक्षचामोर्शी : तालुक्यातील गणपूर येथील रेती घाटातून पोकलँड मशीनद्वारे अवैधरीत्या रेतीचे उत्खनन झाले असल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले असून सदर अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चामोर्शी तालुक्यातील गणपूर येथील रेती घाटावर लिलावाने ठरवून दिलेल्या नियमांचे अटी व शर्तींचे उलंघन करून पोकलँड मशीनद्वारे अवैध उत्खनन करण्यात येत होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र महसूल विभागाचे कर्मचारी कोणतीही कारवाई करण्यास तयार नव्हते. याबाबतचे वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित होताच चामोर्शी तहसीलदार यांनी नायब तहसीलदार एस. टी. खंडारे, मंडळ अधिकारी पी. एम. बोदलकर, घोटचे मंडळ अधिकारी एस. व्ही. सरपे, भेंडाळाचे तलाठी एन. एस. अतकरे यांचे चौकशी पथक नेमले. या पथकाने ६ फेब्रुवारी रोजी गणपूर रेती घाटावर जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली. त्यात लिलावधारकास ताबा दिलेल्या क्षेत्रातून रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे. ताबा दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त सोबतचे मोका चौकशी स्थळ नकाशात दर्शविल्याप्रमाणे अनाधिकृत रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे. लिलावापूर्वी अवैधपणे रेतीचे उत्खनन झाले किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. अनाधिकृत रेतीचे उत्खनन करण्यास संबंधित लिलावधारक जबाबदार असल्याचे दिसते. नकाशानुसार अंदाजे ६ हजार ६८० चौरस मीटर रेतीचे अनाधिकृत उत्खनन झाले आहे. नदी पात्रात रोड तयार करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यालगत मुरूमाचे उत्खनन झाले आहे. त्यामुळे भूमीअभिलेख कार्यालयाने अवैध उत्खनन क्षेत्राची मापणी करून अवैधरित्या रेतीचे उत्खनन झाले. याची शहानिशा करून घ्यावी, असे अहवालात म्हटले आहे. याबाबत तहसीलदार यू. जी. वैद्य यांना विचारले असता, चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. लिलावधारकास बाजू मांडता यावी, यासाठी नोटीस देण्यात आली आहे. योग्य ती कायदेशीर केली जाईल, असे लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)