शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By admin | Updated: October 8, 2015 01:04 IST

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली, अनुदानित आश्रमशाळा कन्हाळगाव व इंदिरा आश्रमशाळा सुकाळा येथील विद्यार्थी ...

विद्यार्थी मृत्यू प्रकरण : आविसं पदाधिकारी व वसतिगृह विद्यार्थ्यांची मागणीगडचिरोली : आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली, अनुदानित आश्रमशाळा कन्हाळगाव व इंदिरा आश्रमशाळा सुकाळा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात वसतिगृहाचे अधीक्षक, कर्मचारी, अनुदानित आश्रमशाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक जबाबदार आहेत. संबंधित दोषींवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला आविसंचे गडचिरोली अध्यक्ष क्रांती केरामी, देवयत्री टोहलिया, प्रकाश मट्टामी, संदीप वरखडे, रविता नैताम, रोहित वड्डे, मानवाधिकार संघटनेचे गजेंद्र डोमळे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गडचिरोलीच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल गीता किन्नाके व तेथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या वसतिगृहाची विद्यार्थिनी प्रगती भजनदास उईके हिचा ४ आॅक्टोबर २०१५ रोजी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. कन्हाळगाव अनुदानित आश्रमशाळेची विद्यार्थिनी छाया कटिया पुंगाटी हीचा २९ सप्टेंबर २०१५ रोजी तेथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. तसेच इंदिरा आश्रमशाळा सुकाळाचा विद्यार्थी सुभाष इष्टाम याचा ३ आॅक्टोबर रोजी संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व अधीक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील आश्रमशाळा वसतिगृह बंद पाडू, असा इशारा दिलामुलींचे वसतिगृह गडचिरोली, अनुदानित आश्रमशाळा कन्हाळगाव व इंदिरा आश्रमशाळा सुकाळा येथील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची प्रकल्प कार्यालयाच्या स्वतंत्र पथकामार्फत तसेच आदिवासी विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून चौकशी सुरू आहे. सुकाळा आश्रमशाळेला आपण मंगळवारी भेट दिली. यावेळी येथील मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आले. आश्रमशाळा प्रशासन विद्यार्थी मृत्यू प्रकरणास जबाबदार असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. त्यामुळे सुकाळा आश्रमशाळेच्या संस्थाचालकांना गैरव्यवस्थेबाबत नोटीस बजावणार आहोत. चौकशी अहवालानंतर विद्यार्थी मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करणार- विकास राचलेवार, प्रकल्प अधिकारी गडचिरोली