शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनंतर कार्यालय इमारतींची दुरूस्ती

By admin | Updated: December 30, 2014 23:35 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या बॅरेकमधील इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुमारे ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे.

गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या बॅरेकमधील इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुमारे ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीनंतर गडचिरोली येथे अनेक शासकीय कार्यालये निर्माण करण्यात आली. मात्र प्रत्येकच शासकीय कार्यालयाला सुसज्ज इमारत बांधून देणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर मोठमोठे चार बॅरेक बांधले. या इमारतींमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा दुग्ध कार्यालय, राज्य शासनाचा पाणीपुरवठा विभाग, नगर रचना कार्यालय आदी जवळपास २० ते २५ कार्यालये या ठिकाणी स्थापन करण्यात आले. सदर इमारतींचे बांधकाम १९८३ ते १९८५ या कालावधीत करण्यात आले. शासकीय खर्च वाचविण्यासाठी या इमारतींवर सिमेंटने बनलेले पत्रे टाकण्यात आले. ३० वर्षांमध्ये छतावरील पत्रे अनेक ठिकाणी तुटले होते. त्यामुळे पावसाचे पाणी कार्यालयामध्ये गळत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर महत्वाचे दस्ताऐवजही खराब होण्याला सुरूवात झाली होती. त्यामुळे या बॅरेकची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिक व या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे करण्यात येत होती. मात्र चारही बॅरेकच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याने शासनाकडून दुरूस्तीसाठी दुर्लक्ष केले जात होते. दस्ताऐवजाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन शासनाने सदर बॅरेकच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. त्यातून या बॅरेकच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या बॅरेकमधील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय असलेले पहिले बॅरेक असून याच बॅरेकपासून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जुने पत्रे बदलवून त्या ठिकाणी नवीन पत्रे टाकण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणचे आडे मोडले असून सदर आडेही बदलविले जात आहेत. आजपर्यंत गळत्या छताखाली नागरिकांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. कार्पोरेट लूकप्रमाणे सदर कार्यालय दिसणार नाही. मात्र ऊन, वारा, पाऊस यापासून किमान संरक्षण होणार आहे. त्यामुळे कार्यालयाच्या दुरूस्तीचे काम त्वरेने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)