शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रेपनपल्लीत होणार जलसाठवण केंद्र

By admin | Updated: January 17, 2017 00:44 IST

सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांंतर्गत तालुक्यातील रेपनपल्ली येथे पाणीसाठवण केंद्र निर्माण केले जाणार असून या कामाचे भूमिपूजन १५ जानेवारी रोजी करण्यात आले.

भूमिपूजन : सीआरपीएफच्या ९ बटालीयनचा पुढाकारअहेरी : सिव्हीक अ‍ॅक्शन कार्यक्रमांंतर्गत तालुक्यातील रेपनपल्ली येथे पाणीसाठवण केंद्र निर्माण केले जाणार असून या कामाचे भूमिपूजन १५ जानेवारी रोजी करण्यात आले.यावेळी सीआरपीएफ बटालीयन ९ चे कमांडंट राजेंद्र प्रसाद, सरपंच ईश्वरी गेडाम, सहायक कमांडंट सचिनकुमार, निरीक्षक भरतसिंह, पीएसआय विठ्ठल दुरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना कमांडंट राजेंद्र प्रसाद म्हणाले, जमिनीतील पाण्याची पातळी उन्हाळ्यातही टिकवून ठेवण्यासाठी भूमिगत जलसंचय निर्मिती होणे आवश्यक आहे. भविष्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय करू नये, असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी कविता, वर्णमाला व अंकलिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सरपंच ईश्वरी गेडाम यांनी मार्गदर्शन करताना सीआरपीएफचे जवान जनतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर आहेत. त्याचबरोबर समाजसेवेचेही काम करीत आहेत. नागरिकांनीही त्यांना मदत करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला रेपनपल्ली येथीलही नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)