शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांच्या नाकावरून हटला मास्क, डेल्टा प्लसला रोखणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

मनाेज ताजने लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण जसजसे कमी होत आहेत तसतसे लोक बिनधास्तपणे वागायला ...

मनाेज ताजनेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण जसजसे कमी होत आहेत तसतसे लोक बिनधास्तपणे वागायला लागले आहेत. ४० टक्के लोक सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करीत असले तरी नियम न पाळणाऱ्यांची संख्या ६० टक्के आहे. एकीकडे अनलॉक प्रक्रियेतील पुढचा टप्पा गाठण्याचा विचार सरकार करत असताना बिनधास्तपणे वागणाऱ्या लोकांमुळे ‘डेल्टा प्लस’ या नवीन व्हेरिएंटला आमंत्रण मिळून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभाग कोरोनाची तिसरी लाट येणार हे गृहित धरून तयारीला लागला आहे. डेल्टा प्लस हा कोरोनाचा व्हेरिएंट आधीपेक्षा जास्त घातक आहे. त्यामुळे उपचारापेक्षा रोगापासून दूर राहण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र गडचिराेलीकर नागरिक त्याबाबत अजुनही गंभीर नसल्यामुळे कारवाई सुरू करणे गरजेचे झाले आहे.

वाहतूक शिपायासोबत नगर परिषदेचा माणूस द्याशहरातील वाहतूक नियंत्रण पोलिसांना कोरोनाच्या नियमांसाठी कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे चौकात ड्युटी करणाऱ्या वाहतूक नियंत्रक शिपायासोबत नगर परिषदेने आपल्या माणसाची ड्युटी लावून दिल्यास वाहतुकीसोबत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई करणे सोपे होऊ शकते. त्यासाठी नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे

मास्क नसणाऱ्यांवरील कारवाई थंडावली- गडचिरोली शहरात कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी नगर परिषदेकडे दिली आहे.- दोन महिन्यांपूर्वीपर्यंत नगर परिषदेच्या पथकाने बऱ्याच प्रमाणात कारवाया करून दंडही वसूल केला आहे.- कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर नगर परिषदेच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्यांवरील कारवाया बंद केल्या.

- तर कारवाई करणारकोरोनाची लाट कमी झाली असली तरी नागरिकांनी अजूनही नियमांचे पालन करायचे आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचारी मास्क लावूनच जातात. दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांनाही मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. म्हणजे नागरिक मास्कशिवाय घराबाहेर पडणार नाही. तरीही लोक नियम पाळत नसतील तर पुन्हा दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल.- रवींद्र भंडारवारउपमुख्याधिकारी, न. प. गडचिरोली

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या