शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:19 IST

भामरागड : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने नगर पंचायतीच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही २४ डिसेंबर राेजी करण्यात आली. ...

भामरागड : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने नगर पंचायतीच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही २४ डिसेंबर राेजी करण्यात आली.

सदर जागेची निवड ही घनचकरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रासाठी करण्यात आलेली हाेती. परंतु या जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले हाेते. दरम्यान राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशानुसार या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे काम करणे अत्यावश्यक आहे आणि तसे न झाल्यास नगर पंचायतीला दरमहा १ लाख रुपये आर्थिक दंडाची कार्यवाही हाेऊ शकते. या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून नगर पंचायतवर ९ लाख रुपये दंडाची नाेटीस बजाविण्यात आली. सदर दंडाबाबत वारंवार सूचना देऊनही या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत नव्हती. दरम्यान अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमणधारकावर आर्थिक दंड लादला जाईल, असे कर व प्रशासकीय अधिकारी आशिष बारसागडे यांनी स्पष्ट केले.

अतिक्रमण काढल्याने ही जागा माेकळी झाली असून या जागेवर लवकरच नगर पंचायत प्रशासनातर्फे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदाल यांच्या निर्देशानुसार नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डाॅ. सुरज जाधव, तहसीलदार अनमाेल कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उपविभागीय पाेलीस अधिकारी कुणाल साेनवने यांच्यामार्फत पाेलीस बंदाेबस्त पुरविण्यात आला हाेता. यावेळी पाेलीस उपनिरिक्षक तसेच लगतची जमीन वनविभागाची असल्याने वन परिक्षेत्राधिकारी विशाल चव्हाण, व भूमिअभिलेख कार्यालयाचे सुमित लढे उपस्थित हाेते.

फाेटाे : भामरागड जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढताना कर्मचारी.