शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पस्थळीच वस्तीचे पुनर्वसन करा

By admin | Updated: May 31, 2014 23:28 IST

आरमोरी तालुक्यातील मानापूर गटग्रामपंचायत अंतर्गत कोसरी, मांगदा, तुलतुली या गावांचा समावेश होतो. एका ग्रामपंचायतमधील दोन गावांत मोठय़ा सिंचन प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून

चव्हेलावासीयांची मागणी : कोसरी प्रकल्पातील बुडीत गावांचे प्रश्न सुटणार काय?वैरागड : आरमोरी तालुक्यातील मानापूर गटग्रामपंचायत अंतर्गत  कोसरी, मांगदा, तुलतुली या गावांचा समावेश होतो. एका ग्रामपंचायतमधील दोन गावांत मोठय़ा  सिंचन प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून गाजावाजा करून सुरू आहे. परंतु सिंचन प्रकल्पाची अवस्था अतिशय बिकट आहे. ज्या कोसरी प्रकल्पाचे ३३ वर्षानंतर काम सुरू करण्यात आले. त्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायमच आहे, असे असतांनाही कोसरी प्रकल्पाचे काम सुरू करण्याची कल्पना कुणाची असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत. कोसरी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये येणार्‍या चव्हेला गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याचे शासनाव्दारे प्रयत्न करण्यात आले. पण येथील नागरिकांनी पुनर्वसनाला स्पष्ट नकार दिला. ज्या प्रकल्पासाठी आम्हाला घरदार सोडावे लागणार आहे, या प्रकल्पाच्या पाण्यावरच इतर गावातील शेतकर्‍यांच्या जीवनात सुख येणार आहे. तर आम्ही बेघर कसे होणार या प्रकल्पाचे पाणी ज्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी आम्हाला जमीन देऊन पुनर्वसन करावे, अशी भावनिक साद नागरिक घालत आहेत.  परंतु नागरिकांचे पुनर्वसन न करताच कोसरी सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम कुणाच्या डोक्यातील कल्पना आहे, असा प्रश्न चव्हेला व परिसरातील नागरिक करीत आहेत. कोसमी लघुपाटबंधारे योजनेमुळे ७७५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तरीपण या भागातील नागरिक सांगतात की कोसरी प्रकल्पाजवळ असलेल्या मांगदा या गावाला सिंचनाचा कोणताच फायदा होणार नाही. मांगदा येथील संतोष वालोदे म्हणतात की, कोसरी प्रकल्पाची कल्पना कोणी आणि कशी साकार केली हे कळायला मार्ग नाही या प्रकल्पामुळे जवळच्या गावाला लाभ नाही. त्या प्रकल्पावर कोट्यवधी रूपये खर्च करून कोणता फायदा होणार.मानापूर, देलनवाडी आणि थोडाफार नागरवाही गावाचा भाग या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात येणार आहे. कोसरी प्रकल्पाबद्दल मांगदा, मानापूर, देलनवाडी येथील नागरिकांच्या अनुकूल प्रतिक्रीयाही नाही. या प्रकल्पामुळे या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. पण वनव्याप्त क्षेत्राची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे असे मत देलनवाडी येथील भामराज हष्रे यांनी व्यक्त केले.  सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. पुनर्वसन अन्यत्र ठिकाणी करण्याच्या विरोधात येथील नागरिक ठाम आहेत. (वार्ताहर)