शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाक्षरीखाली नोंदणी क्रमांक आवश्यक

By admin | Updated: August 3, 2014 23:22 IST

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्त वेतन योजनेत बोगस लाभार्थ्याचा भरणा दिवसागणीक वाढत आहे़ या योजनेत वयाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या स्वाक्षरीखाली संपूर्ण नाव,

बोगस लाभार्थ्यांवर आळा बसणार : वैद्यकीय प्रमाणपत्र देताना डॉक्टरांचे नाव लागणारदेसाईगंज : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्त वेतन योजनेत बोगस लाभार्थ्याचा भरणा दिवसागणीक वाढत आहे़ या योजनेत वयाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या स्वाक्षरीखाली संपूर्ण नाव, हुद्या, नोंदणी क्रंमाक ठळक अक्षरात लिहीण्याचा शासनादेश महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे़ अवैद्यरित्या बोगस वयाचे प्रमाणपत्र देऊन शासनाची लूट करणाऱ्यावर लाभार्थ्यावर यामुळे आळा बसणार आहे़सर्वसामान्यासाठी कल्याणकारी अशा संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जातात़ कित्येक अपंग व निराधार कुटूंबाला या योजनांमुळे आधार मिळाला आहे़ मात्र या योजनांचा लाभ गरज असलेल्या लाभार्थ्यांना न देता बोगस लाभार्थी घेत असल्याच्या तक्रारी लोकायुक्त महाराष्ट्र सरकार यांच्याकडे प्राप्त झाल्या़ बोगस लाभार्थी हुडकुन काढण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे़ वयासबंधी बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश झाला आहे़ त्यामुळे लोकायुक्ताकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार उपलोकायुक्तांनी तयार केलेल्या अहवालातील शिफारसी नुसार संजय गांधी किंवा श्रावणबाळ या योजनेत वयाचे व अपंगाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वाक्षरी खाली ठळक अक्षरात हुद्या, संपूर्ण नाव, नोंदणी क्रमांक हे न चुकता लिहिण्याचे आदेश दिले आहेत़ तसेच ही योजना चालविणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रावर शासनादेशा निर्देशानुसार नोंदी आहेत किंवा नाही याची खात्री करावयाची आहे़ शासनाच्या या निर्णयामुळे या योजनेत बोगसरित्या जाऊ लाभ मिळविणाऱ्या लाभार्थ्यांवर आळा बसेल, अशी आशा आहे. अनेक ठिकाणी राजकीय लोकांनी आपल्या सोयीसाठी लाभार्थ्यांचे निकष डावलून काम केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची चौकशी झाल्यास अनेक जण अडकण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)