शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रेगडीच्या विश्रामगृहाची दुरवस्था कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST

घोट : नजीकच्या रेगडी येथील जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्यावतीने विश्रामगृह बांधण्यात आले; दरम्यान २००६ मध्ये नक्षलवाद्यांनी या विश्रामगृहाची जाळपाेळ ...

घोट : नजीकच्या रेगडी येथील जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्यावतीने विश्रामगृह बांधण्यात आले; दरम्यान २००६ मध्ये नक्षलवाद्यांनी या विश्रामगृहाची जाळपाेळ केली. तेव्हापासून या विश्रामगृहाच्या साेयी-सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून विश्रामगृह दुरुस्तीची मागणी हाेत असली तरी याकडे प्रशासनाने कानाडाेळा केला आहे.

जलसंपदा विभाग नागपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर व सिंचन उपविभाग चामोर्शी शाखा घोटच्या अंतर्गत येत असलेल्या रेगडी येथे सन १९७३ ते १९७४ साली विश्रामगृह बांधण्यात आलेले होते. दरम्यान, सन २००६ मध्ये नक्षलवाद्यांकडून या विश्रामगृहाची जाळपोळ करण्यात आली होती. रेगडी येथील कन्नमवार जलाशय हे जिल्ह्यातील एकमेव मोठे जलाशय आहे, तसेच या जलाशयावर वन विभागाने वनाेद्यान उभारलेले आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक दरराेज येतात; परंतु पर्यटकांना विश्राम करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही, त्यामुळे जुने विश्रामगृह दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.