शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओतर्फे ८८ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:22 IST

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मार्फत एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत वाहनांवर कारवाई करून ८८ लाख ३० हजार रूपयांचा महसूल गोळा केला आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यांतील स्थिती : दुसºया राज्यातील वाहनांकडून सर्वाधिक कर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मार्फत एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत वाहनांवर कारवाई करून ८८ लाख ३० हजार रूपयांचा महसूल गोळा केला आहे.अवैैध वाहतूक करणाºया वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. या विभागाला दर वर्षी शासनाच्या मार्फत महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनाकडून दिले जाते. गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दर महिन्याला जवळपास १८ लाख महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात चारचाकी, दुचाकी व माल वाहतूक वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्याला मासिक उद्दिष्टही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा, छत्तीसगड राज्याला लागून आहेत. या जिल्ह्यातून तेलंगणा, छत्तीसगड राज्यासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश राज्यातूनही वाहने येतात. या वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत तडजोड शुल्क व विभागीय कारवाईच्या माध्यमातून राज्यातील वाहनांकडून २२ लाख ९२ हजार रूपयांचा महसूूल गोळा केला आहे. तर इतर राज्यातील वाहनांकडून ५१ लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. राज्यातील वाहनधारकांकडून ९ लाख २७ हजार रूपयांचा चालू कर व ४ लाख १७ हजार रूपये एवढा थकीत कर वसूल केला आहे. इतर राज्यातील वाहनधारकांकडून चालू कराच्या माध्यमातून ९४ हजार रूपये कर गोळा केला आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाला पाच महिन्यांत ८८ लाख ३० हजार रूपये महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. या विभागाने या कालावधीत उद्दिष्टाएवढाच म्हणजे ८८ लाख ३० हजार रूपयांचा महसूल गोळा केला आहे. दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. नोंदणी करतेवेळी प्रत्येक वाहनावर शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर वाहनमालक वाहनपरवाना काढत असल्याने वाहनपरवान्याच्या माध्यमातूनही लाखो रूपयांचा महसूल आरटीओ विभागाकडे गोळा होतो. गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दरवर्षी दिलेले उद्दिष्ट गाठते.१४ ते ३१ आॅगस्टदरम्यान मोहीम१४ ते ३१ आॅगस्टदरम्यान परिवहन विभागाने विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याअंतर्गतचे पथक बदलविण्यात आले होते. एका जिल्ह्यातील पथकाला दुसºया जिल्ह्यात पाठविले होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांवर कारवाई करून महसूल गोळा करण्यात आला. १ आॅगस्ट ते १३ आॅगस्ट या कालावधीत गडचिरोली आॅफिस कॉडने १३ दिवसांच्या कालावधीत १२ लाख रूपयांचा महसूल गोळा केला आहे.