शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मान्यता

By admin | Updated: September 4, 2014 23:48 IST

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले असून या विभागाकरीता

गडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले असून या विभागाकरीता प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पदव्युत्तर विभागातील शैक्षणिक वाटचालीला गती देण्यासाठी लवकरच प्राध्यापकांची मंजूर झालेली पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे. गोंडवाना विद्यापीठात, इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, वाणिज्य व गणित असे पाच पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले आहेत. या पदव्युत्तर विभागाकरीता १५ प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ५ पदे प्राध्यापक व १० पदे सहयोग प्राध्यापकांची भरावयाची आहे. या पदासाठी येणाऱ्या १ कोटी ४७ लाख रूपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली आहे. शासनाच्या उच्च व तंत्रविभागाकडून पदभरती संदर्भात शासन पत्रक काढल्यानंतर शासन निकषानुसार पदव्युत्तर विभागासाठी सदर १५ प्राध्यापकांची पदे भरण्यात येणार आहे. त्यानंतर पदव्युत्तर विभागाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)