शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दूध प्रकल्पाच्या चौकशीसाठी आवाज उठवावा

By admin | Updated: October 17, 2015 02:00 IST

गडचिरोली शहरालगतच्या शिवणी येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. विजय वडेट्टीवार यांनी शिवाणी दूध प्रकल्प सुरू केला होता.

पत्रकार परिषद : अतुल गण्यारपवार यांचा विजय वडेट्टीवारांना टोलागडचिरोली : गडचिरोली शहरालगतच्या शिवणी येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. विजय वडेट्टीवार यांनी शिवाणी दूध प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाला सरकारचे अनुदानही त्यांनी मिळविले. नंतर हा प्रकल्प बंद झाला. या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी विधानसभेत आ. विजय वडेट्टीवार यांनी आवाज उठवावा व या भागातील शेतकऱ्याच्या मागणीला न्याय द्यावा, अशी भूमिका जिल्हा परिषदेचे बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी मांडली. अतुल गण्यारपवार म्हणाले की, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत १ कोटी १७ लाखांचा कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. १० कोटी रूपयांची कामे राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमातून करण्यात आली. या कामासंदर्भात आ. विजय वडेट्टीवार यांनी तक्रार केली होती. त्याची चौकशीही पूर्ण करण्यात आली. त्यात बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बाजूने निकाल लागलेला आहे. बाजार समितीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी व्हावी म्हणून आपण मागील वेळी बाजार समितीचे सभापती असताना चौकशी समिती गठित केली होती. या चौकशी समितीने चौकशीचा ससेमेरा लावल्याने त्या कंत्राटदाराने आपल्या विरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली व खोट्या प्रकरणात आपल्याला अडकविले. १ कोटी १७ लाखांचा अपहार कंत्राटदाराने केला. या गैरव्यवहारासोबत बाजार समिती व आपला संबंध नाही. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने काँग्रेस सदस्यांनी राहावे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे ही बाब पेंटारामा तलांडी यांनीच आपल्याला सांगितली, असेही गण्यारपवार म्हणाले.भ्रष्टाचाराच्या चौकशांचे पुढे काय होते हे जनतेला ठाऊक आहेकाँग्रेसच्या ज्या सदस्यांनी भाजप-सेना सदस्य असलेल्या बाजुने अविश्वासाच्या वेळी मतदान केले. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे हे विधानसभेतील उपनेते काय कारवाई पक्षस्तरावरून करणार आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. एकीकडे वडेट्टीवार हे काँग्रेसचे विधीमंडळातील राज्याचे नेते आहे व त्यांच्याच भागात ही परिस्थिती घडलेली असताना ते याबाबत काहीही करण्याची भूमिका घेत नाही, ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे गण्यारपवार यांनी सांगितले. वडेट्टीवार यांनी आपल्या राजकीय इतिहासात अनेक चौकश्या यापूर्वीही लावलेल्या आहे. त्या चौकशांचे पुढे काय होते, हे जनतेला चांगले ठाऊक आहे, असा उपरोधिक टोलाही गण्यारपवार यांनी यावेळी लगाविला. चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद परमानंद मल्लीक या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनाच देण्यात आला आहे. मल्लीक हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते असून काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना याची जाण आहे. वडेट्टीवारांना कदाचित हा इतिहास माहित नसावा, असेही गण्यारपवार यावेळी म्हणाले. आपण काँग्रेस पक्षातील प्रवेशासाठी वडेट्टीवारांकडे कधीही विनंती केली नाही. देश व राज्यपातळीवर काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या वडेट्टीवारांसारख्या नेत्यांनी स्थानिक राजकारणात जास्त ढवळाढवळ करू नये, असा सल्लाही गण्यारपवार यांनी दिला आहे. या देशाची न्याय व्यवस्था आपण लाचेच्या प्रकरणात दोषी आहो किंवा नाही, हे ठरवेल. हे ठरविण्याचा वडेट्टीवारांना तिळमात्र अधिकार नाही, असेही गण्यारपवार यांनी यावेळी म्हणाले.