शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बुरूड समाजाने हक्कासाठी लढा उभारावा

By admin | Updated: March 27, 2016 01:15 IST

बुरूड समाजाचा पारंपरिक व्यवसाय बांबूवर अवलंबून असून सध्या बांबूचे दर प्रचंड वाढले आहे. शासन पुरेशा प्रमाणात बांबूचा पुरवठा करीत नाही.

रामकृष्ण मडावी यांचे आवाहन : बुरूड समाजाचे विदर्भस्तरीय अधिवेशनआरमोरी : बुरूड समाजाचा पारंपरिक व्यवसाय बांबूवर अवलंबून असून सध्या बांबूचे दर प्रचंड वाढले आहे. शासन पुरेशा प्रमाणात बांबूचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे बुरूड समाजाचा व्यवसाय संकटात आला आहे. बुरूड समाजाने आपल्या न्याय, हक्कासाठी संघटीतपणे लढा उभारावा, असे आवाहन माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले. बुरूड समाज बहुउद्देशीय विकास संस्था आरमोरीच्या वतीने आरमोरी येथे शनिवारी बुरूड समाजाच्या विदर्भस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश गराडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य लक्ष्मी मने, युवा सेना जिल्हा प्रमुख चंदू बेहरे, माणिक भोयर, विनोबा गराडे, मधुकर हिरापुरे आदी उपस्थित होते. शासनाने बुरूड कुटुंबांना बांबू लागवडीसाठी पाच एकर जमीन देऊन त्यांना आत्मनिर्भर करावे, अशी मागणी माजी आमदार डॉ. मडावी यांनी यावेळी केली. यावेळी जि.प. सदस्य लक्ष्मी मने म्हणाल्या, आरमोरी येथे वन विभागाकडे दोन इमारती तयार आहेत. या इमारतीमध्ये अगरबत्ती प्रकल्प व हस्तकला केंद्र सुरू केल्यास शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात ‘बुरूड समाजाच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील प्रा. श्रीहरी नागापुरे होते. प्रमुख अतिथी म्हणून वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर उपस्थित होते. यावेळी प्रा. नागपुरे यांनी बांबू व्यवसायातून बुरूड समाजाचा विकास होणार नाही. त्यामुळे बुरूड समाजाने परंपरागत व्यवसायावर अवलंबून न राहता, नव्या उद्योग व व्यवसायाची कास धरावी, असे सांगितले. वन परिक्षेत्राधिकारी तांबटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर हिरापुरे, संचालन गोपाल हिरापुरे, नरेश हिरापुरे यांनी केले तर आभार देवेंद्र हिरापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बुरूड समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बुरूड समाज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)