शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पावसाळ्यात लावलेली रोपे नष्ट

By admin | Updated: October 18, 2014 01:30 IST

युती शासनाच्या काळात मोठा गाजावाजा करून झुनकाभाकर योजना सुरू करण्यात आली होती. महसूल विभागाने केंद्र उभारण्यासाठी गावागावात जागा उपलब्ध करून दिली.

वैरागड : युती शासनाच्या काळात मोठा गाजावाजा करून झुनकाभाकर योजना सुरू करण्यात आली होती. महसूल विभागाने केंद्र उभारण्यासाठी गावागावात जागा उपलब्ध करून दिली. मात्र दोन वर्षातच सदर योजना गुंडाळावी लागली होती. कमी पैशात भुकेल्यांना अन्न मिळावे हा तत्कालीन सरकारचा उद्देश प्रामाणिक होता. परंतु योजना राबविणारे हात गढूळ असल्याने सदर योजनेचा बट्याबोळ झाला. सदर योजनेचा प्रत्यय मागील तीन वर्षापासून राज्यात राबविल्या जाणाऱ्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या रूपात आला आहे. वैरागड येथे पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा तिनदा झाडे लावण्यात आली. परंतु सदर रोपटे अल्पवधीतच नष्ट झाली. त्यामुळे शतकोटी वृक्ष लागवड योजना ुफसवी असल्याचे दिसून आले आहे.शतकोटी वृक्ष लागवड योजनेची असफलता बघता, सदर योजना आजमितीला सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. २०११ पासून सुरू करण्यात आलेली शेतकोटी वृक्ष लावगड योजना जिल्ह्यात फारशा प्रमाणात परिणामकारक ठरू शकली नाही. जिल्ह्यातील योजनेचे सत्य आता बाहेर पडू लागले आहे. शाळेमधून हरितसेनेच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी केलेल्या तपासणीत निम्म्याहून अधिक वृक्ष मृत झाल्याचे दिसून आले आहे. मागील तीन वर्षात प्रशासकीय यंत्रणेने प्रामाणिकपणे काम न केल्याचा परिणाम सदर योजनेवर झाला आहे. पहिल्या वर्षात लावलेली रोपटे जगली नाहीत, म्हणून त्याच ठिकाणी दुसऱ्या वर्षी वृक्ष लागवड करण्यात आली. तरीही दुसऱ्यांदा लावलेली रोपटे अल्पावधीतच मृतप्राय झाली. शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या यशस्वीतेचा बागुलबुवा करण्यासाठी तेवढाच निधी खर्च करून तिसऱ्यांदा झाडे लावण्यात आली. परंतु या योजनेत भरपूर प्रमाणात पैसे असल्याने काही विशिष्ट लोकांचेच खिसे गरम करण्याचे काम सदर योजनेच्या माध्यमातून झाले आहे, असा आरोप अनेक ग्रामीण स्तरावरील लोकांकडून होत आहे. जिल्हा वनव्याप्त असतानाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सदर योजना सुरू करण्यात आली. त्यामुळे या योजनेची खरच गरज होती काय, असाही प्रश्न उपस्थित होते आहे. अनेक रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. त्या ठिकाणी आधिच जंगल होते. छोट्या रोपांच्या संरक्षणासाठी मोठ्या वृक्षांची तोड करून कुंपण करण्यात आले. रोपांच्या संरक्षणासाठी नैसर्गिकरित्या वाढलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली. रोपही नष्ट झाले. त्यामुळे या योजनेतून काय साध्य झाले, असाही प्रश्न निर्माण होत आहे. (वार्ताहर)