शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

वीज पोहोचण्यापूर्वी विसोऱ्यात ६० वर्षांपूर्वी पोहोचले होते रेडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:01 IST

गावात माेेबाईल व टीव्ही ही साधने पाेहाेचण्यापूर्वी जनसंवादासाठी रेडिओ हे एकमेव दृकश्राव्य माध्यम हाेते. नागपूरच्या व्यक्तीने बाेललेला आवाज आपल्या घरात ऐकू येणे, हे एक कुतूहलच वाटत हाेते. त्यामुळे रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्यासाठी दिवसभर परशुरामकर यांच्या घरी वर्दळ राहात हाेती. सन १९६० च्या दरम्यानचे रेडिओ बॅटरीवर चालणारे होते. त्यामुळे त्याला विजेची गरज पडत नव्हती.

ठळक मुद्देआज जागतिक रेडिओ दिन

अतुल बुराडेलाेकमत न्यूज नेटवर्कविसोरा : मनोरंजसाठी गाणी ऐकणे, जगाची खबर जाणून घेण्यासाठी बातम्या ऐकणे यासाठी अर्धशतकापूर्वीच्या काळात रेडिओ हे एकमेव साधन होते. ज्यांच्याकडे रेडिओ आहे ते लोक श्रीमंत म्हणून गणल्या जात. अरण्यपट्ट्यात वसलेल्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा या गावात आजही त्या काळातील रेडिओच्या आठवणी जाग्या करणाऱ्या व्यक्ती आहेत. आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी १९६० मध्ये या गावातील प्रतिष्ठित नागरिक उद्धव परशुरामकर यांनी चंद्रपूर येथून रेडिओ विकत घेऊन आणला होता. या भागातील तो पहिला रेडिओ होता.गावात माेेबाईल व टीव्ही ही साधने पाेहाेचण्यापूर्वी जनसंवादासाठी रेडिओ हे एकमेव दृकश्राव्य माध्यम हाेते. नागपूरच्या व्यक्तीने बाेललेला आवाज आपल्या घरात ऐकू येणे, हे एक कुतूहलच वाटत हाेते. त्यामुळे रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्यासाठी दिवसभर परशुरामकर यांच्या घरी वर्दळ राहात हाेती. सन १९६० च्या दरम्यानचे रेडिओ बॅटरीवर चालणारे होते. त्यामुळे त्याला विजेची गरज पडत नव्हती.या रेडिओवर नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम ऐकले जात होते. विशेष बाब म्हणजे, तब्बल ६० वर्षांपूर्वी विसोरात जेव्हा पहिला रेडिओ आला, तेव्हा गावात वीजसुद्धा आलेली नव्हती. सन १९६४ ला विसोरात वीज पाेहाेचली. रेडिओ दाखल झाले, त्यावेळी गावामध्ये टीव्हीचा पत्ता नव्हता. म्हणजेच परशुरामकर यांनी आणलेला रेडिओ विसोरातले पहिलावहिले प्रसारमाध्यम होते. त्यामुळे रेडिओची प्रचंड क्रेझ होती. गावामध्ये रेडिओ ऐकण्यास सकाळपासून वीस-पंचवीस लोकांची सतत गर्दी असायची. त्यानंतर, फिलिप्स, मर्फी, नेल्को या कंपनींचे रेडिओ विसोरा येथे आणल्या गेले. रेडिओ आगमनाच्या पूर्वी गावातील कुणी शहराच्या ठिकाणी शिकत असेल वा जात असेल, तो व्यक्ती  गावात आल्यावर वाचून-ऐकून देशातील, जगातील घटनांची माहिती देत असे. तेव्हा रेडिओच्या बॉक्समधून आवाज ऐकू येणे हे आश्चर्यच होते. म्हणूनच रेडिओ ऐकण्यास लोकांची गर्दी व्हायची. विसोरा येथील काही धनाढ्य लोक माेठ्या शहरांत नेहमी जात, त्यामुळे त्यांना बाजारात येणाऱ्या नवनव्या वस्तूंची माहिती हाेत असे.

टीव्ही, माेबाइलने घेतली रेडिओची जागा२० वर्षांपूर्वी ग्रामीण भागात माेबाइल पाेहाेचला नव्हता, तर टीव्ही घेणे सर्वसाधारण व्यक्तीला परवडत नव्हते, तसेच गावात असलेला टीव्ही अँटिनावर चालविला जात असल्याने या टीव्हीवर दूरदर्शन हे एकच चॅनल दिसत हाेते. परिणामी, सर्वसामान्य व्यक्ती रेडिओच खरेदी करीत हाेेता. मात्र, डीटीएच सेवा ग्रामीण भागात उपलब्ध झाल्यानंतर अनेक चॅनल दिसायला लागले, तसेच टीव्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा हाेऊन टीव्हीच्या किमती सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यात आल्याने नागरिक टीव्ही खरेदी करायला लागले. त्यानंतर, आलेल्या स्मार्ट माेबाइलवर साेशल मीडियाचा विस्तार हाेऊन नागरिक रेडिओला विसरत आहेत.

 

टॅग्स :electricityवीज