शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मेंढपाळ कुटुंबासमोर निर्माण झाला उदरनिर्वाहाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मेंढपाळ कुटुंब हे वर्षभर जंगलात मेंढ्या चरायला घेऊन जातात व त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. १५ सप्टेंबरला गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील देवावार या मेंढपाळ कुटुंबातील सात वर्षांच्या बालकावर बिबट्याने जंगलात हल्ला करून ठार केले. वाघ-बिबट्यामुळे आता जीवालाच धोका निर्माण झाला, तर जंगलात जायचे कसे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न त्या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने मेंढपाळ कुटुंब चांगलेच धास्तावले आहे. आपल्या मेंढ्या कुठे चरायला न्यायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. भंगाराम तळोधी येथील २० ते २५ कुटुंबे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. एका कुटुंबाकडे १०० ते १५० मेंढ्या असतात. वर्षभर या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मेंढ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात. गावालगत जंगलात एखाद्या ठिकाणी रात्री ते मुक्कामही करतात. त्याच ठिकाणी खाली झोपतात. त्यामुळे साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश होण्याची भीती असते. तरीही ते जीवावर उदार होऊन जंगलात झोपतात.  काही दिवसांपूर्वी कोरचीजवळ मेंढपाळ कुटुंबातील  १०० ते १३० मेंढ्या वीज पडून ठार झाल्या होत्या.

जीवावर उठलेल्या वाघांचा बंदोबस्त करा

देसाईगंज : काही दिवसांत वाघाने केलेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. त्या वाघास मानवी रक्ताची चटक लागल्याने आणखीही अनेकांचा जीव तो घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदनातून केली आहे. n वाघाने नुकतेच आरमोरी तालुक्यातील देलोडा खुर्द येथील इसमास तर बिबट्याने मार्कंडा येथील जंगलात गोंडपिपरी तालुक्यातील सात वर्षीय बालकास ठार केले. याशिवाय देसाईगंज तालुक्यातील बोळधा (गावगन्ना) ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या रावणवाडी टोली येथील प्रभू नैताम यांच्या गोठ्यात बांधलेल्या १५ शेळ्या बिबट्याने ठार केल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीत वावरत आहे. सदर बिबट कधीही मानवावर हल्ला करून जीव घेण्याची शक्यता लक्षात घेता त्याला तत्काळ जेरबंद करा, अशी मागणी आ. गजबे यांनी केली.

 

टॅग्स :Tigerवाघ