शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नान्ही व आंधळीतील धान खरेदी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:19 IST

धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे.

ठळक मुद्देसाठवणूक क्षमता संपली : धानाची उचलच नाही; अवकाळी पाऊस आल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : धान साठवणूक क्षमता संपल्याने आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या नान्ही (वडेगाव) व आंधळी येथील धान खरेदी मागील आठवडाभरापासून ठप्प पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली असून खरेदी केलेल्या मालाची तत्काळ उचल करून गोदाम रिकामा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.उघड्यावर धान ठेवल्याने वेळेवर पाऊस आल्यास धान भिजून मोठ्या प्रमाणात आदिवासी विकास महामंडळाचे यापूर्वी नुकसान झाले आहे. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी ज्या संस्थेकडे धान साठवणूक करण्यासाठी गोदामाची व्यवस्था आहे किंवा संस्थेच्या प्रांगणात ओट्याचे बांधकाम केले आहे. अशा संस्थांनाच धान खरेदीची परवानगी दिली आहे.नान्ही व आंधळी येथील संस्थांकडे गोदाम उपलब्ध नाही. त्यामुळे या संस्थांनी ओट्याचे बांधकाम करून खरेदी सुरू केली. दोन्ही संस्थांनी प्रत्येकी जवळपास पाच हजार क्विंटल धान खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने भरडाईसाठी उचल केली नाही. त्यामुळे सदर धान खरेदी केंद्राच्या आवारातच ताडपत्री झाकून पडून आहे. ओट्याचीही साठवणूक क्षमता संपल्याने धान खरेदी करू नये, अशा सूूचना आदिवासी विकास महामंडळाने संस्थेला दिल्या असल्याने या सूचनांनुसार संस्थेने मागील आठवडाभरापासून धान खरेदी बंद पडली आहे. शेतकऱ्यांच्या धानाची मळणी पूर्ण झाली आहे. खरीपासाठी घेतलेले कर्ज मार्च महिन्याच्यापूर्वी परत करावे लागणार आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धान आणण्यास सुरूवात केली आहे. मात्र धान खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे धान वजन न करताच ठेवले जात आहे. वेळेवर पाऊस आल्यास धानाची मोठी नासाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी आहे.हजारो क्विंटल धान उघड्यावरगोदाम नसल्याने नान्ही व आंधळी या दोन्ही संस्थांनी धान खरेदी आठवडाभरापासून बंद ठेवली आहे. मात्र याची माहिती ग्रामीण भागातील शेतकºयांना नाही. त्यामुळे शेतकरी बैैलबंडीने धान खरेदी केंद्रावर आणत आहेत. मागील आठ दिवसांत हजारो क्विंटल धान उघड्यावर पडले आहे. अचानक पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने धानाची उचल करून ओटे मोकळे करून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.