शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी जनजागृती

By admin | Updated: June 30, 2016 01:37 IST

दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी ठिकठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे.

एटापल्लीत मोटारसायकल रॅली : मानापुरात मार्गदर्शन कार्यक्रमएटापल्ली/मानापूर/देलनवाडी : दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी ठिकठिकाणी वृक्ष लागवड होणार आहे. या कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता एटापल्ली येथे मोटारसायकल रॅली तर मानापूर येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एटापल्ली वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी एच. जी. मडावी यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचाऱ्यांनी वन परिक्षेत्र कार्यालयापासून मोटारसायकल रॅली काढली. यावेळी एटापल्ली, टोला, जीवनगट्टा, कृष्णार आदी गावांतून फिरविण्यात आली. वन परिक्षेत्र कसनसूर अंतर्गत १ हजार झाडे लावण्याची उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने लोकसहभागातून खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात आले. कसनसूर, रोपी, कसूरवाही, हनपायली, सरखेडा, दिंडवी, पैडी आदी गावांमध्ये खड्डे खोदण्यात आले. परंतु वृक्ष लागवड झाल्यानंतर वृक्ष संवर्धनाकरिता संरक्षक कठडे लावण्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे तालुक्यात लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जीवंत राहणार, ही चिंतेची बाब आहे. देलनवाडी वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वृक्ष लागवडीबाबत गावागावांत ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तांडे, पाडे, वस्त्यांमध्ये वृक्ष लागवडीबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. वृक्ष लागवड जनजागृती करण्याच्या हेतूने मानापूर येथे विवेकानंद विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनपाल मसराम, सावसाकडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून वृक्ष लागवड कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)