शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एफडीसीएमविरोधात जनक्षोभ तीव्र

By admin | Updated: March 8, 2016 01:27 IST

तालुक्यातील चिखली रिठ, चिखली तुकूम, विहीरगाव, मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव या गावातील नऊ जणांना वन

देसाईगंज : तालुक्यातील चिखली रिठ, चिखली तुकूम, विहीरगाव, मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव या गावातील नऊ जणांना वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ५ मार्चला तीन ते चार गावातील नागरिकांनी देसाईगंज पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. पोलिसांची सदर कारवाई चुकीची असल्याने जनक्षोभ भडकण्यासाठी जबाबदार असणाऱ्या एफडीसीएमच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा वन विकास महामंडळाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना रविवारी पाठविले आहे. ५ मार्च रोजी कटाई केलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी आणलेल्या एफडीसीएमच्या वाहनांना गावकऱ्यांनी अडविले. त्यामुळे गावातील वातावरण पुन्हा तीव्र झाले. एफडीसीएम अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच ग्रामस्थ, इतर चार अशा एकूण नऊ जणांवर ३९५ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दरम्यान आमदार क्रिष्णा गजबे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल, पं.स. सभापती प्रीती शंभरकर, पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांना परत पाठविण्यात आले. ग्रामस्थ व एफडीसीएम अधिकाऱ्यांच्या भांडणात जोपर्यंत तोडगा निघत नाही. तोपर्यंत एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी जंगल कटाई व वाहतूक करू नये अशा सूचना आमदार गजबे यांनी केल्या आहेत. (वार्ताहर)