शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शेतकऱ्यांना सिंचन सुविधा द्या

By admin | Updated: April 25, 2017 00:34 IST

मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला सिंचन विहीर, उपसा सिंचन योजना तसेच मामा तलाव आदी योजनांचा लाभ देऊन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवा, ...

अशोक नेते यांचे निर्देश : पशुसंवर्धन व कृषी विभागाची आढावा बैठकगडचिरोली : मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला सिंचन विहीर, उपसा सिंचन योजना तसेच मामा तलाव आदी योजनांचा लाभ देऊन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले. सोमवारी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्कीट हाऊसमध्ये त्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार क्रिष्णा गजबे, जि.प. सदस्य मिना कोडाप, उदय बोरावार, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, दिलीप कौशीक, रेखा डोळस, जावेद अली आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, चामोर्शी तालुक्यात रेगडी येथे एकमेव कन्नमवार जलाशय आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून १४ गावातील शेतजमिनीला धरणाचे पाणी मिळत नाही. या १४ गावातील शेवटच्या शेतीपर्यंत सिंचन पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश खासदार नेते यांनी दिले. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आदींची माहिती त्यांनी जाणून घेतली. ६० गावांना कुक्कुट पालनात मॉडेल गाव म्हणून प्रस्ताव तयार करा, असे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात कुक्कुट पालन व्यवसायास मोठा वाव आहे. कोेंबड्यांना प्रत्येक वर्षी सहा महिन्याच्या अंतराने दोनदा लस देण्याचे नियोजन करावे. शेळी फार्मचा प्रस्ताव व्यापक स्वरूपात बनवून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. बैठकीला कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)