प्रमुख वक्त्यांचा सूर : अहेरीत एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रअहेरी : विज्ञान, तंत्रज्ञान व धावपळीच्या युगात जागतिकीकरणामुळे साहित्य व संस्कृती लोप पावत आहे. जागतिकीकरणात कोणतेही क्षेत्र सुटलेले नाही. इतकेच नव्हे तर ग्रामीण समाजावर अधिक प्रभाव पडत आहे. जागतिकीकरणात साहित्य व संस्कृतीचे रक्षण करावे, असा सूर श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयात सोमवारी आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्रात मान्यवरांनी काढला. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा ‘जागतिकीकरण आणि भारतीय समाज’ या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र अहेरी येथे आयोजित करण्यात आले. उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख डॉ. जे. व्ही. दडवे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. एम. के. मंडल, डॉ. आर. एच. गायधने, डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. चंद्रशेखर गौरकार, डॉ. लोनबले उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी नाही, असा सूर मान्यवरांनी काढला. एक दिवसीय कार्यक्रमात पहिल्या सत्रात अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे होते. यावेळी प्रा. डॉ. सुदर्शन हिवसे यांनी निबंध वाचन, प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर यांनी सुरेश भटांची गझल व राष्ट्रीय कविता सादर केल्या. या सत्राचे संचालन प्रा. डॉ. सुधीर भगत यांनी केले. दुसरे सत्र प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी निबंध वाचन, प्रा. डॉ. धनराज खानोरकर यांनी सुरेश भटांची स्फूर्तीगीते, भावकवितांचे वाचन केले. संचालन प्रा. डॉ. राज मुसने यांनी केले. ‘जागतिकीकरण आणि भारतीय ग्रामीण समाज’ या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जे. एम. काकडे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. गौतम कांबळे उपस्थित होते. याच विषयावरील दुसऱ्या सत्रात अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश तितरे होते. प्रा. प्रमोद घोनमोडे, प्रा. रवींद्र हजारे यांनी निबंध वाचन केले. या सत्राचे संचालन प्रा. अविनाश भुरसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर तर आभार चंद्रशेखर गौरकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. नामदेव मोहुर्ले, प्रा. बोरकर, प्रा. गजानन जंगम, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा. नागसेन मेश्राम, प्रा. प्रकाश ढेंगळे, प्रा. मंगला बन्सोड, प्रा. काटकर, प्रा. घोडेस्वार, प्रा. दीपक उत्तरवार, प्रा. हरिभाऊ निखाडे, प्रा. घोडेस्वार, प्रा. पोहणकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
साहित्य व संस्कृतीचे रक्षण करा
By admin | Updated: February 21, 2017 00:46 IST