शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या थांब्यावरून खासगी वाहनांची प्रवाशी उचल

By admin | Updated: February 12, 2016 01:48 IST

गडचिरोली शहरात धानोरा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य बसस्थानक आहे. या बसस्थानक परिसरात धानोरा, पेंढरीकडे जाणाऱ्या अनेक काळी-पिवळी वाहने उभे राहतात.

गडचिरोली शहरात धानोरा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य बसस्थानक आहे. या बसस्थानक परिसरात धानोरा, पेंढरीकडे जाणाऱ्या अनेक काळी-पिवळी वाहने उभे राहतात. बसस्थानकावरून ते प्रवाशांना बोलावून आपल्या वाहनात बसवितात. गडचिरोली शहरात नव्याने बांधलेल्या महिला व बाल रूग्णालयासमोर इंदिरा गांधी चौकात एसटीचा अधिकृत थांबा आहे. येथे चंद्रपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसही थांबतात व एसटीच्या आधी दिवसभर त्या रांगेत लागून राहतात. त्यामुळे एसटीचेच सर्व प्रवाशी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहून नेतात. हा खासगी बसगाड्यांचा थांबा शहरातील वाहतुकीसाठीही अडचणीचा आहे. परंतु आरटीओ व पोलीस विभाग हा थांबा हटविण्यास आणाकानी करीत आहे. चामोर्शी मार्गावर खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर एसटीचा अधिकृत थांबा आहे. येथेही काळी-पिवळी वाहनचालक व काही खासगी बसगाड्या अनाधिकृतपणे थांबून एसटीच्या प्रवाशांची उचल करतात. त्यामुळे एसटीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. आरमोरी मार्गावर श्री मंगल कार्यालयासमोर एसटीचा अधिकृत थांबा आहे. येथेही नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसने आपली दुकानदारी उघडून आपल्या बसेस रस्त्यावर उभ्या ठेवून एसटीचे प्रवाशी उचलण्याचा गोरस धंदा गेल्या १०-१५ वर्षांपासून चालविला आहे. एसटीच्या वेळापत्रकानुसार या सर्व मार्गावर खासगी बसेस आपलेही वाहने सोडतात. त्यामुळे एसटीला एकट्या गडचिरोली शहरात दररोज किमान ५० हजारावर अधिक रूपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. खासगी वाहनांवर नियंत्रण आणण्याबाबत उच्च न्यायालयाने सक्त आदेश दिलेले असतानाही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी विभागाला कुणीही सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसटीला मोठ्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे.