शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी दवाखान्याची तोडफोड

By admin | Updated: May 27, 2017 01:19 IST

येथील लाखांदूर मार्गावरील टुटेजा हॉस्पिटलचे डॉ. इंद्रजीतसिंग टुटेजा यांनी शुक्रवारी रात्री १.३० च्या सुमारास लहान आजारी मुलाला

डॉक्टरने उपचार करण्यास दिला नकार : संतापलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांचे कृत्य लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : येथील लाखांदूर मार्गावरील टुटेजा हॉस्पिटलचे डॉ. इंद्रजीतसिंग टुटेजा यांनी शुक्रवारी रात्री १.३० च्या सुमारास लहान आजारी मुलाला उपचारासाठी आणले असता, स्वत:ची तब्येत बरोबर नसल्याची सबब पुढे करून आजारी मुलावर उपचार करण्यास टाळाटाळ केली. वास्तविक डॉ. टुटेजा यांची तब्येत ठणठणीत असतांना देखील त्यांनी आजारी मुलावर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने संतापलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी सदर हॉस्पिटलची तोडफोड केली. सदर घटनेबाबत डॉ. इंद्र्रजीतसिंग टुटेजा यांनी रात्री २ वाजता देसाईगंज पोलीस स्टेशन गाठून देसाईगंज येथील शिवाजी वॉर्डातील प्रणय देवढगले या आजारी रुग्णाच्या नातेवाईकांविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पहाटे ४ वाजता वैद्यकीय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान देसाईगंज शहरात पीसीपीएनडीटी नियमांना धाब्यावर बसवून बेधडक व नियमबाह्य रूग्णांची शस्त्रक्रिया करणाऱ्या चार खाजगी रुग्णालयाकडे शस्त्रक्रिया केंद्राची रितसर परवानगीच नसून या यादीत डॉ. टुटेजा हॉस्पिटलचा समावेश असून याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून देसाईगंज शहरात काही खाजगी डॉक्टरांनी अनेक खाजगी आंतररूग्णालय थाटले असून बऱ्याच रुग्णालयाकडे आॅपरेशन थेटरची नोंदणीच जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे केली नसून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले असून रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्ड विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र नाही, रुग्णालय स्टाफमध्ये जीएनएम नाही, देसाईगंज नगर परिषदचे नाहरकत प्रमाणपत्र नाही, अग्निशमन सुरक्षा प्रमाणपत्र नाही, तर काही रुग्णालयानी जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांच्याकडून घेतलेली परवानगी प्रमाणपत्रदेखील मुदतबाह्य झाले असून नूतनीकरण देखील केले नसल्याची बाब उघडकीस आली होती. याबाबतचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे सोपवून कारवाई करण्यासाठी अभिप्राय दिल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार होती. मात्र मागील दोन महिन्यापासून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे प्रकरण दडपून ठेवण्यात आले होते. मात्र या प्रकरणामुळे प्रकरणाने पुन्हा डोके वर केले असून रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाई करण्यापूर्वी देसाईगंज पोलिसही या दिशेने तपास करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सारिका गुरू या पुढील तपास करीत आहेत. टुटेजा हॉस्पिटलचे संचालक डॉ इंद्रजीतसिंग टुटेजा यांनी रात्री २ वाजताच्या सुमारास देसाईगंज पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली, ते पहाटे चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशनलाच होते. त्यांची तब्येत ठणठणीत होती. - रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, देसाईगंज माझी तब्येत बरी नसल्याने मी माझ्या हॉस्पिटलच्या रात्र पाळीवर असलेल्या नर्स ला रात्री आपातकालीन रुग्णाना घेण्यास मज्जाव केलेला होता, मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी दरवाजा तोडून नुकसान केले आहे, त्यावरून देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. - डॉ. आय. एन. टुटेजा, संचालक, टुटेजा हॉस्पिटल देसाईगंज.