शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पणासाठी पोलिसांकडून दबाव

By admin | Updated: September 14, 2015 01:15 IST

वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत.

धोरणावर टीका : पत्रकातून नक्षल्यांचा आरोप गडचिरोली : वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत. वेळप्रसंगी त्यांच्यावर अत्याचारही करीत आहेत. असे भाकपा (माओवादी) सचिव भास्कर याने दुर्गम भागात टाकलेल्या पत्रकातून म्हटले आहे. पोलीस विभागाने आत्मसमर्पण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नक्षल चळवळ सोडून गेलेल्या सदस्यांवर दबाव टाकला जात आहे. आत्मसमर्पितांना त्यांच्या गावाकडे जाऊ दिले जात नाही. त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. गुलामाप्रमाणे गडचिरोली किंवा अहेरी शहरात ठेवले जाते. यामुळे आत्मसमर्पितांच्या जीवन जगण्याच्या अधिकारावरच गदा आली आहे. यालाच नवजीवन म्हणायचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. हे नवजीवन नसून नवदमन असल्याचेही नक्षलपत्रकात म्हटले आहे. हिंसा व अत्याचाराच्या विरोधात संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी आत्मसमर्पितांनी मुक्तीची लढाई लढली पाहिजे. परिवार व जनता यांच्या खांद्याला खांदा मिळवून अस्तित्वाची लढाई लढली पाहिजे. पोलिसांकडून विविध प्रकारचे खोटी आश्वासने दिली जातात. त्यांना बळी पडू नये, असे सुध्दा नक्षल्यांनी म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)हिडामीवरील गोळीबाराचा निषेध२५ आॅगस्ट रोजी सायंकाळी मुरकुटी जंगलात सी- ६० पथकाने बोंडे गावातील आदिवासी शेतकरी कमलसिंग हिडामी याच्यावर गोळीबार करून त्याला जखमी केले. त्यानंतर हिडामीला अटक करून नक्षलवादी घोषित केले. या घटनेचा भाकपा (माओवादी) संघटना निषेध करीत आहे, असे कोरची उपकमांडर जगदीश यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे. नैनवाडी येथील उमेश मट्टामी हा पोलिसांना मदत करीत होता. पैशाच्या लालसेने तो नक्षल्यांची माहिती पोलिसांना देत असल्याचेही म्हटले आहे.