शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

११ केव्हीचे वीज उपकेंद्र रखडले

By admin | Updated: August 6, 2015 02:18 IST

चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) व परिसरात जादा विद्युत पुरवठा अनेकदा सुरू असतो. यामुळे विजेचा अपव्यय होतो.

ंदीड वर्षांचा कालावधी उलटला : केवळ ट्रॉन्सफॉर्मर व खांबच केले उभेतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) व परिसरात जादा विद्युत पुरवठा अनेकदा सुरू असतो. यामुळे विजेचा अपव्यय होतो. मात्र यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दीड वर्षांपूर्वी चामोर्शीवरून येणाऱ्या तळोधी व कुनघाडा या दोन गावांच्या विद्युत पुरवठ्यासाठी ११ केव्हीचे स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सदर ११ केव्हीच्या विद्युत उपकेंद्राचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडले आहे.तळोधी (मो.) येथे स्वतंत्र ११ केव्हीच्या विद्युत उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर विद्युत पोल उभारून रोहित्र बसविण्याचे काम इन्प्रा या नामवंत कंपनीला देण्यात आला. कामाचे आदेश मिळाल्यानंतर या कंपनीच्या पर्यवेक्षकांनी विद्युत खांब उभारून काही ठिकाणी तारा टाकण्यात आल्या. तसेच एक विद्युत रोहित्र तसाच बांधून ठेवण्यात आला. त्यानंतर सदर विद्युत उपकेंद्राचे पुढचे काम ठप्प पडले. कुनघाडा येथे बसविण्यात आलेला विद्युत रोहित्र पूर्णपणे कोसळला असून कामाच्या दिरंगाईबाबत विद्युत विभागाचे अभियंते आपापल्या पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवित असल्याचे दिसून येते. ११ केव्ही विद्युत उपकेंद्र काम अपूर्णावस्थेत असल्याने विद्युत पुरवठ्याचा तळोधी परिसरातील लपंडाव अद्यापही कायम आहे. तसेच पाच वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेला तळोधी येथील पॉवर स्टेशनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातल्या त्यात ११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे काम कंत्राटदार व वरिष्ठ अभियंत्याच्या दिरंगाईमुळे ठप्प पडले आहे. परिणामी जनतेला विद्युत पुरवठ्याच्या लपंडावाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.या प्रश्नाकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन सदर ११ के व्ही विद्युत उपकेंद्राचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांनी महावितरण तसेच लोकप्रतिनिधीकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) येथील ११ केव्ही उपकेंद्राचे काम थंडबस्त्यात आहे. (वार्ताहर)