शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

खेळातून संकटांना सामोरे जाण्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:31 IST

आदिवासी समाज हा संघटित समाज म्हणून ओळखला जातो. हीच संघभावना आणखी वृद्धिंगत करण्यासाठी खेळाचा उपयोग होतो. खेळ व खेळातून आलेली खिलाडीवृत्ती जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात, असे प्रतिपादन सर्चच्या संचालिका डॉ.राणी बंग यांनी केले.

ठळक मुद्देराणी बंग यांचे प्रतिपादन : पुस्टोला येथे क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी समाज हा संघटित समाज म्हणून ओळखला जातो. हीच संघभावना आणखी वृद्धिंगत करण्यासाठी खेळाचा उपयोग होतो. खेळ व खेळातून आलेली खिलाडीवृत्ती जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात, असे प्रतिपादन सर्चच्या संचालिका डॉ.राणी बंग यांनी केले.जय गोंडवाना युवक, युवती मंडळ पुस्टोला व सर्च संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉ.के.व्ही.चारी यांच्या स्मृतीनिमित्त आदिवासी युवा खेळ व सांस्कृतिक उत्सवाअंतर्गत धानोरा तालुक्याच्या पुस्टोला येथे युवक, युवतींच्या व्हॉलिबॉल व कबड्डी स्पर्धा १० ते १२ जानेवारीदरम्यान घेण्यात आलीे. गुरूवारी सदर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक तथा माजी आ.हिरामण वरखडे होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य मैना कोवाची, सरपंच रंजना आतला, उपसरपंच सुकरू आतला, भूमैया गोमाजी आतला, पोलीस पाटील देवाजी आतला, गावपुजारी सिद्धू मडावी, महारू आतला, किडू हलामी, मधुकर हलामी, सुरेश कोवाची, देवराव कल्लो, रावजी आतला, देवराव आतला, शिक्षक देवराव उईके आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.राणी बंग म्हणाल्या, आदिवासी समाजात असलेल्या अनेक प्रथा व परंपरावर अर्थ लक्षात न घेता बाहेरच्या समाजाकडून टीका केली जाते. पण आदिवासी समाजाला काय हवे आहे, हे ठरविण्याचा अधिकार बाहेरच्या समाजाला नसल्याचे त्या म्हणाल्या. ही संस्कृती टिकविण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे, असे त्यांनी सांगितले.सदर क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण १३० संघ सहभागी झाले आहेत. यशस्वीतेसाठी सर्चचे जीवन शिक्षण विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र इसासरे, नाजूक जाडे, हरिदास साखरे, महादेव सातपुते व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत. डॉॅ.रितू दमाहे यांच्या नेतृत्वात फिरत्या दवाखान्याची चमू आरोग्यसेवा देत आहे.