शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

पूलवजा बंधाऱ्यामुळे सिंचनाची साेय हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST

जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून ७० लाख रुपयांचा निधी पूलवजा बंधारा निर्मितीसाठी मंजूर झाला आहे. या निधीतून ...

जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून ७० लाख रुपयांचा निधी पूलवजा बंधारा निर्मितीसाठी मंजूर झाला आहे. या निधीतून बंधाऱ्याचे बांधकाम हाेणार आहे. मिचगुडा लाल्यावर बंधारा बांधकामाचे भूमिपूजन अहेरीचे पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते झाले. मिचगुडा येथील नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत हाेता. येथील गावकऱ्यांनी ही समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी स्वतः नाल्यावर जाऊन पाहणी केली होती. बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले हाेते. त्यानुसार बंधारा बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. बंधाऱ्यामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. बंधारा भूमिपूजनप्रसंगी जलसंधारण उपविभागीय अभियंता इंगोले, येरमनारच्या सरपंच संध्या मडावी, उपसरपंच विजय आत्राम, डोलू मडावी, वाघा तलांडी, अहेरीचे पेसा समन्वयक एस.कोठारी, दशरथ रामटेके, प्रभाकर झाडे, कैलाश झाडे, लक्ष्मण झाडे, करपा तलांडी, लालू आत्राम, बंडू गावडे, सोमा आत्राम उपस्थित होते.