अहेरी : येथील पोलीस ठाण्यानजीक असलेल्या पंचायत समितीजवळील नाल्यात पडून पोलीस हवालदार विठ्ठल कोलबा लेखामी (४७) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पहाटे पंचायत समितीजवळ असलेल्या नाल्यात दुचाकी गाडीसह एक इसम मृतावस्थेत पडलेला आढळला. याबाबत लोकांनी पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी तत्काळ धाव घेऊन मृतकाची ओळख पटविली. तो अहेरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होता. सध्या विठ्ठल लेखामी निलंबित असून तो मूळचा गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी गावचा रहिवासी आहे. त्याच्या मागे दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार मनोहर भुसारी, हवालदार संजय अल्लमवार करीत आहे. (शहर प्रतिनिधी)
नाल्यात पडून पोलिसाचा मृत्यू
By admin | Updated: March 2, 2016 01:50 IST