शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस रेझिंग डे निमित्त चामोर्शी शहरात स्वच्छता अभियान

By admin | Updated: January 7, 2017 01:31 IST

महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पोलीस व नगर पंचायत

विविध विभागांचा पुढाकार : कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी लावला झाडू चामोर्शी : महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पोलीस व नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर झाडू लावून रस्ते स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता अभियानात तहसील कार्यालय, नगर पंचायत, वन, पोलीस विभागासह विविध महाविद्यालय व शाळा आदींनी पुढाकार घेतला. नगर पंचायत कार्यालयापासून आठवडी बाजार, बाजारपेठ, लक्ष्मी गेट परिसर, बायपास तहसील रोड, पंचायत समिती रोड ते आष्टी-मूल टी-पार्इंट व शहराच्या इतर परिसरात स्वच्छत मोहीम राबविण्यात आली. यात तहसील कार्यालय व वनविभागाचे कर्मचारी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, नगर पंचायत व पोलीस कर्मचारी आदींनी सहभाग घेतला. याप्रसंगी चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे, पोलीस निरीक्षक किरण अवचर, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहुल नैताम, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगर पंचायतीचे सभापती शातलवार, सभापती सुमेध तुरे, सविता पिपरे, सुनीता धोडरे, नगरसेवक वैभव भिवापुरे, मीनल पालारपवार, रोशनी वरघंटे, मंदा सरपे, कविता किरमे, मंजूषा रॉय, अविनाश चौधरी, वनपरिक्षेत्राधिकारी कैलास धोंडणे, क्षेत्रसहायक टोकला, वैद्यकीय अधिकारी चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, सचिन गावडे, प्रभाकर कापुरे, निशा खोब्रागडे, प्रा. भुरभुरे, प्रा. म्हस्के आदी उपस्थित होते. या अभियानामुळे चामोर्शी शहरातील सर्व रस्ते व परिसर स्वच्छ झाले आहे. (शहर प्रतिनिधी) न. पं. परिसरात वृक्षारोपण महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्त चामोर्शी शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रस्ता व मुख्य परिसरातील कचरा संकलित करण्यात आला. सदर कचरा ट्रॅक्टरद्वारे शहराच्या बाहेर फेकण्यात आला. त्यानंतर नगर पंचायत कार्यालय परिसरात अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण केले. यावेळी वृक्ष संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला.