शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेसाठी पोलिसांतर्फे मदत

By admin | Updated: June 26, 2017 01:11 IST

तालुक्यातील बोरी येथील दीपक पत्रू आदे या २० वर्षीय युवकाला शस्त्रक्रिया करण्यासाठी अहेरी पोलिसांनी

कौतुक : प्राणहिता पोलीस कॅम्पमधील जवानांचा पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील बोरी येथील दीपक पत्रू आदे या २० वर्षीय युवकाला शस्त्रक्रिया करण्यासाठी अहेरी पोलिसांनी सात हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे. शस्त्रक्रियेसाठी दीपक आदेला लाखो रूपयांचा खर्च येणार आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एवढा मोठा खर्च उचलणे त्याला शक्य नाही. ही बाब प्राणहिता पोलीस कॅम्पमधील पोलीस अधिकाऱ्यांना माहीत झाली. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनात पोलीस जवानांनी सुमारे सात हजार रूपयांची आर्थिक मदत गोळा केली व ती मदत दीपकच्या पालकांकडे सुपूर्द केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, दत्ता दराडे, अमोल फडतरे, अक्षय ठिकने, नेताजी बंडगर, शिवाजी नन्नावरे, पोलीस जवान शेरा पठाण, पराग ओल्लालवार, अनिल गुरनुले, अखिल कोलपाकवार उपस्थित होते. अहेरी पोलिसांनी आजपर्यंत अनेक गरजूंना मदत केली आहे. नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करण्याचेही काम अहेरी पोलीस करीत असल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे. शस्त्रक्रियेसाठी इतरही नागरिकांनी दीपक आदे याला आर्थिक मदत करावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी केले आहे.