शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात भरधाव ट्रकने पोलीस शिपायाला चिरडले

By admin | Updated: January 21, 2017 01:52 IST

भरधाव वेगाने मार्गक्रमण करीत असलेल्या एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने घडलेल्या

पोलीस चौकीसमोर अपघात : जागीच मृत्यू; एक जखमी देसाईगंज : भरधाव वेगाने मार्गक्रमण करीत असलेल्या एका ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात कुरखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई जागीच ठार झाला. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. अंगाचा थरकाप उडणारा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास देसार्ईगंज येथील बसस्थानकासमोरील पोलीस चौकीसमोर घडला. नानाजी झुरे (५३) रा. कुरूड असे मृतकाचे नाव असून ते पोलीस शिपाई म्हणून कुरखेडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील रहिवासी असलेले नानाजी झुरे हे आपला पुतन्या तिर्थपाल झुरे (३८) याच्यासोबत दुचाकीने कुरखेडाला जात होते. दरम्यान देसाईगंज शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या पोलीस चौकीसमोर त्यांच्या एमएच ३३ बी ६४५६ क्रमांकाच्या दुचाकीला मागहून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४० एन २८१७ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील तिर्र्थपाल झुरे हे दूरवर फेकल्या गेले. ते किरकोळ जखमी झाले. तर नानाजी झुरे यांच्या शरिरावरून ट्रक गेला. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक घटनास्थळीच ठेऊन पळ काढला. याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, देसाईगंज शहरात शुक्रवारी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती व मार्गदर्शनपर कार्यक्रमही घेण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही वेळातच हा अपघात घडला. (शहर प्रतिनिधी) अतिक्रमणामुळे वाढले अपघात देसाईगंज शहरातील बसस्थानक हे नेहमी वर्दळीचे ठिकाण आहे. या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजुला अतिक्रमण करून दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत. काही दुकाने मुख्य रस्त्यावर चार ते पाच फूट समोर आली आहेत. अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साहित्य खरेदी करणारे ग्राहक रस्त्यावरच दुचाकी वाहने ठेवतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. सदर अतिक्रमण हटविण्याचा फार्स नगर परिषदेने अनेकदा केला. मात्र कायमस्वरूपी अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर अतिक्रमण हटवावे, अशी संतप्त प्रतिक्रिया देसाईगंजवासीयांनी व्यक्त केली आहे.