शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी मोहफूल हातभट्ट्या केल्या उद्ध्वस्त

By admin | Updated: March 26, 2017 00:41 IST

आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी गुरूवारी तालुक्यातील कुकडी व विहिरगाव शेतशिवार परिसरात ....

कुकडी, विहिरगावात धाड : १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्तआरमोरी : आरमोरीचे पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी गुरूवारी तालुक्यातील कुकडी व विहिरगाव शेतशिवार परिसरात अनेक ठिकाणी धाडी टाकून मोहफूल हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. येथून मोहफुलाचा सडवा व त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून एकूण १ लाख ६१ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ठाणेदार महेश पाटील यांनी २३ मार्च रोजी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह कुकडी येथील संतोष कुमरे यांच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता, एक हजार रूपये किमतीची १० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. संतोष कुमरे याच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुकडी येथील शेत शिवारातील हातभट्ट्यावर पोलिसांवर धाड टाकून येथून सडव्याने भरलेले २०० लिटर मापाचे तीन प्लास्टिक ड्रम, मोहफूल सडव्याने भरलेले ५० लिटर मापाचे नऊ प्लास्टिक ड्रम, सात जर्मन केतली, ९० लिटर मोहफूल दारू, मातीचे २६ मडके व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पुन्हा कुकडी, विहिरगाव परिसरात धाड टाकली व येथून २० लिटर मोहफूल दारू, प्लास्टिक कॅन, पाण्याची रिकामी टँक व इतर साहित्य मिळून एकूण २२ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.तिसऱ्या एका घटनेत गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे उसेगाव ते आष्टा रस्त्याने दुचाकीने देशी दारूची आयात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी उसेगाव ते आष्टा दरम्यानच्या रस्त्यावर सापळा रचला. दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दुचाकीवरील इसमांनी दारूने भरलेले दोन पोते तिथेच टाकून भरधाव वेगात पळून गेले. सदर पोत्याची पाहणी केली असता, येथे ४० हजार रूपये किमतीच्या देशी दारूच्या ८०० निपा आढळून आल्या. आरोपी विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारसह दीड लाखांची दारू पकडलीमिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक यांनी सापळा रचून शनिवारी गोकुलनगर परिसरात कार अडवून येथून कारसह दीड लाखांची दारू जप्त केली. चामोर्शी मार्गावरून गोकुलनगरकडे कारने दारूची वाहतूक होत होती. पोलिसांनी गणेश मंदिराजवळ सापळा रचून एक लाखाची कार व ५० हजाराची दारू जप्त केली. या प्रकरणी शालिक खटूजी कावळे, गौतम कुसूमराव चौधरी रा. नागभिड यांच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.