शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी अडविला तेंदू ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:06 IST

ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय.

ठळक मुद्देकसनसूर येथे कारवाई : सकाळपासून ट्रक पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांची वाहतूक करणारे ट्रक कसनसूर पोलिसांनी अडविल्याने ग्रामसभांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ग्रामसभांनी दिलेला वाहतूक परवाना असतानाही ट्रक थांबविणे म्हणजे वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत नाहक अडथळा निर्माण करणे होय. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.रामदास जराते यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, यंदा घोटसूर परिसरातील ६ ग्रामसभांनी स्वत: तेंदूपानांचे संकलन केले. या तेंदूपानांची राजोली, मूल येथील गोदामात साठवणूक करण्याकरिता शनिवारपासून वाहतूक सुरू करण्यात आली. वाहतुकीकरिता वनविभागाकडून टी.पी.बुक घेऊन ग्रामसभेने संबंधित वाहनांना टी.पी.जारी केली. मात्र, सकाळी १० वाजेपासून कसनसूर पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोर दोन ट्रक तेंदूपानांसह थांबवून ठेवले आहे. रात्री ७ वाजेपर्यंत सदर ट्रक पोलिसांच्या ताब्यातच होते. एकीकडे एट्टापल्ली तालुक्यातील इतर ग्रामसभांनी तेंदूपत्ता न तोडल्याने लोकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असतांना घोटसूर परिसरातील ६ ग्रामसभांनी तोडलेल्या तेंदूपानांचे ट्रक थांबविण्याचा प्रकार चिंताजनक आहे. चिरीमिरीकरिता नाहक त्रास देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कारवाई करावी व ग्रामसभेला तेंदूपानांची वाहतूक करण्यास सहकार्य करावे. तसेच वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केली आहे.याबाबत काही ग्रामस्थांनी ट्रक अडविणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला विचारणा केली असता, साहेब यायचे आहेत, तोपर्यंत ट्रक सोडणार नाही, असे उत्तर देत होता. नेमक्या कोणत्या कारणासाठी ट्रक दिवसभर अडवून ठेवला, हे कळायला मार्ग नाही.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली