शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खरिपात दोन लाख हेक्टरवर होणार धानाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:33 IST

२०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड होणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान सादर केली.

ठळक मुद्देआढावा बैठक : मागणीनुसार पीक कर्ज देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर धानाची लागवड होणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान सादर केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, कृषी सहसंचालक अर्चना कडू उपस्थित होते.कृषी कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये यासाठी पीक कर्ज देणे ही प्रत्येक बँकेने स्वत:ची जबाबदारी समजावी. शेतकºयांनी मागणी करताच त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतील प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.सर्व बँकांना मिळून ८५ कोटी १७ लाख २७ हजार रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. मागील वर्षी १ लाख ८२ हजार हेक्टरवर धानाची रोवणी झाली होती. यावर्षी दोन लाख हेक्टरवर धानाची रोवणी होईल. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. सोयाबिनचे सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार ६४६ हेक्टर असले तरी सोयाबिनखालील क्षेत्र कमी होत चालले आहे. मागील वर्षी केवळ ३९३ हेक्टरवर सोयाबिनची लागवड झाली होती. कापसाचे क्षेत्र मात्र वाढत चालले आहे. मागील वर्षी सुमारे १४ हजार ४६१ हेक्टरवर कापूस लावला होता. यावर्षीच्या हंगामात १५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची शक्यता आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा तालुक्यामधील ५० गावांमधील २९६ आदिवासी कुटुंबांना परसबाग योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी बैठकीत सादरीकरण केले. तर आत्मातर्फे डॉ. प्रकाश पवार यांनी विविध प्रयोगांची माहिती दिली.२८ हजार हेक्टर क्विंटल बियाणे लागणारदोन लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड होणार आहे. यासाठी २६ हजार ७४० क्विंटल धानचे बियाणे लागणार आहेत. सोयाबिन ३०० क्विंटल, तूर ३५० क्विंटल, बिटी कापूस २०२ क्विंटल, मका १४५ क्विंटल, उडीद तीन क्विंटल या प्रमाणे एकूण २७ हजार ७५५ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे.३८८ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरकृषी विभागाच्या उन्नत शेती समृध्द शेतकरी या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ३८८ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर ४ कोटी २९ लाख २० हजार रूपये खर्च झाले आहेत. याशिवाय रोटोव्हेटर, दालमिल सुध्दा देण्यात आली आहे.५४ शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभशेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपयांचा विमा दिला जातो. मागील तीन वर्षात या योजनेंतर्गत १२६ प्रस्ताव कंपनीकडे पाठविले होते. त्यापैकी ५४ प्रस्ताव मंजूर होऊन विम्याची रक्कम देण्यात आली. १७ प्रस्ताव नामंजूर केले असून ३६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. वारसदारांकडे १९ प्रस्ताव प्रलंबित आहे, अशी माहिती देण्यात आली.