शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फेंद्री नदीपुलाजवळील खड्डा धोकादायक

By admin | Updated: August 19, 2016 00:52 IST

धानोरा तालुक्यातील मुस्का ते खांबाळा मार्गावरील फेंद्री नदीवरील पुलाजवळील रस्ता खचला असल्याने मोठा खड्डा पडला आहे.

आमदारांनी केली पाहणी : वाहन नदीत कोसळण्याचा धोका; अपघात वाढले आरमोरी : धानोरा तालुक्यातील मुस्का ते खांबाळा मार्गावरील फेंद्री नदीवरील पुलाजवळील रस्ता खचला असल्याने मोठा खड्डा पडला आहे. सदर खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी बुधवारी या खड्ड्याची पाहणी केली. सदर खड्डा तत्काळ बुजविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. भाकरोंडी परिसरातील गावांमधील नागरिक ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच वर्दळ राहते. मुस्का ते खांबाळादरम्यान फेंद्री नदी आहे. या नदीवर पूल बांधण्यात आला आहे. मागील महिन्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसात पुलाजवळील पिचिंग व माती वाहून गेली. त्यामुळे अर्धाच रस्ता शिल्लक आहे. ट्रक, बस व इतर चारचाकी वाहने या ठिकाणावरून नेताने तारेवरची कसरत करावी लागते. रात्रीच्या सुमारास सदर खड्डा नजरेस न पडल्यास वाहन सरळ नदीमध्ये कोसळण्याचा धोका आहे. याबाबतची माहिती या परिसरातील नागरिकांनी आ. क्रिष्णा गजबे यांना दिली असता, त्यांनी सदर खड्ड्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान सदर खड्डा धोकादायकच असल्याचे लक्षात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली जाईल. त्याचबरोबर सदर खड्डा तत्काळ दुरूस्त करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी) आश्रमशाळेची पाहणी याच मार्गावर असलेल्या भाकरोंडी येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आरोग्य, शिक्षण, भोजण व्यवस्थेबद्दल चर्चा करून माहिती जाणून घेतली. भाकरोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी चर्चा करून रुग्णालयातीलही सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली.