चामाेर्शी शहरातील मार्कंडपुरा व कुंभार माेहल्ला वाॅर्डासाठी जलशुद्धिकरण केंद्रापासूनच वेगळी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड आल्यास पाणीपुरवठा बंद हाेताे. मात्र, इतर वाॅर्डांचा पाणीपुरवठा सुरू असताे. दाेन्ही वाॅर्डात वास्तव्यास असलेले बहुतांश नागरिक हे शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या खरीप हंगामातील पऱ्हे टाकणे, तूर, तीळ लागवड करण्याचे दिवस आहेत. शेतकरी सध्या व्यस्त आहेत. पेरणीच्या कामाची लगबग सुरू आहे. त्यातच पाणीपुरवठा बंद असल्याने या वाॅर्डातील महिलांना सकाळच्या सुमारास पाणी भरण्यातच वेळ घालवावा लागत आहे. चामाेर्शी शहरातील दाेन वाॅर्ड वगळता सर्व वाॅर्डातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून या वॉर्डाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स .......
दुरुस्तीसाठी माेटार पाठविली
चामाेर्शी शहरातील दाेन वाॅर्डांतील पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद असल्याने महिलांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. आणखी किती दिवस ही समस्या कायम राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्येबाबत नगरपंचायतचे अभियंता निखिल कारेकर यांना विचारणा केली असता, मोटार स्टार्टर नादुरुस्त आहे. तो दुरुस्तीसाठी पाठविला असून येत्या एक-दोन दिवसांत येथील पाणीपुरवठा सुरळीत हाेईल, असे सांगितले.