शहरं
Join us  
Trending Stories
1
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
4
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
5
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
6
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
7
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
8
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
9
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
10
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
11
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
12
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
13
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
14
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
15
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
16
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
17
"अभिनेत्यांना सकाळी डाएट फुड अन् रात्री ड्रग्स हवे", पहलाज निहलानींचा खुलासा; अक्षयबद्दल म्हणाले...
18
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
19
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
20
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!

पीएचसींना मिळणार तीन वैद्यकीय अधिकारी

By admin | Updated: March 20, 2015 01:25 IST

जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून यात पुन्हा सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची भर पडली आहे.

चामोर्शी : जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून यात पुन्हा सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची भर पडली आहे. शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. या संबंधीचे आरोग्य संचालकांचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अपुऱ्या पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत होता. त्यामुळे रूग्णांना वेळीच आरोग्य सेवा प्राप्त होण्यास अडचण जात होती. आरोग्य सेवा सुधारण्याकरिता तत्कालीन जि. प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे यांनी आरोग्य सेवा संचालनाकडे सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व नवीन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्याकरिता पत्र पाठविले होते. त्यानुसार आरोग्य संचालकांनी नवीन पदे व प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्या संदर्भातील पत्र २ फेब्रुवारीला पाठविले. या पत्रात जिल्ह्यात आलापल्ली, भेंडाळा, रंगय्यापल्ली, पिंपरी येथे नवीन चार प्राथमिक आरोग्य केंद्र व २०१४ च्या आराखड्यानुसार लखमापूर बोरी, बुर्गी येथे प्रत्येकी एक असे एकुण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता आकृतीबंधानुसार १५ पदे मंजूर करण्याचेही नमुद करण्यात आले आहे. शासनाच्या बृहत आराखड्यानुसार अधिक लोकसंख्या असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता आरोग्य सेविकांची १ हजार ७२, वैद्यकीय अधिकाऱ्यांची २१० व प्रयोगशाळा तंत्रज्ञांची ९१ पदे निर्माण करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता मनुष्यबळ निर्माण करण्यात आले असले तरी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाल्यास सदर केंद्रांना अतिरिक्त पदे मंजूर केली जाणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)