शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रेती कंत्राटदाराला १.३३ कोटींचा दंड

By admin | Updated: June 7, 2017 01:12 IST

देसाईगंज तालुक्यातील वैनगंगा नदीतील सावंगी रेती घाटातून प्रमाणापेक्षा अधिक रेतीचे उत्खनन

२४५९ ब्रास रेतीची अवैध वाहतूक लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील वैनगंगा नदीतील सावंगी रेती घाटातून प्रमाणापेक्षा अधिक रेतीचे उत्खनन कंत्राटदाराने अवैधरित्या केले असल्याचे उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांना आढळून आल्यानंतर रेती कंत्राटदार नजाहत परवेज खान रा.भंडारा यांच्यावर १ कोटी ३२ लाख ७८ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. नजाहत खान यांच्या किंझा ट्रेडर्स या कंपनीला सावंगी नदी घाटातील सर्वे क्रमांक २१७ ते २२३ च्या पश्चिमेस चार हेक्टर जागेत २१ हजार २८० ब्रास रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र मोक्यावर जाऊन मोजमाप केले असता, मंजूर क्षेत्रातून ५ हजार १०९ ब्रास रेती व मंजूर क्षेत्राबाहेरील भागातून ११ हजार ५३३ ब्रास रेती असे एकूण १६ हजार ६४२ ब्रास रेतीचे उत्खनन केले असल्याचे आढळून आले. रेती व वाळू वाहतुकीच्या अभिलेखांची तपासणी केली असता, अभिलेखांमध्ये केवळ ८ हजार २४८ ब्रास रेतीचे उत्खनन झाले असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर नदीच्या किनाऱ्यावर ५ हजार २३५ ब्रास रेती साठवणूक केल्याचे दिसले. अभिलेख व नदी किनाऱ्यावर साठवून ठेवलेली रेती लक्षात घेतली तर कंत्राटदाराने १४ हजार १८३ ब्रास रेतीचे उत्खनन केले असल्याचे निदर्शनास येते. परंतु मोजमापानुसार १६ हजार ६४२ ब्रास रेतीचे उत्खनन झाले आहे. यावरून कंत्राटदाराने २ हजार ४५९ ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक केली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने लिलाव करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले. याबाबत कंत्राटदाराला २ मे रोजी नोटीस बजावून त्याचे म्हणणे स्पष्ट करण्यास सांगितले होते. ६ मे रोजी कंत्राटदाराच्या वतीने अमीन परवेज खान व राहूल सतवानी यांनी लेखी उत्तर सादर केले. कंत्राटदाराने केलेले मोजमाप कोणत्याही तांत्रिक अधिकाऱ्यांकडून केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांचे मोजमाप अचूक नाही, हे स्पष्ट होत होते. कंत्राटदाराने २ हजार ४५९ ब्रास रेतीचे अवैध उत्खनन केल्याचे निकृष्ट झाल्याने प्रती ब्रास ४०० रूपये प्रमाणे ९ लाख ८३ हजार ६०० रूपयांची रॉयल्टी व बाजारमुल्याच्या पाच पट दंड म्हणजेच, पाच हजार रूपये प्रती ब्रास याप्रमाणे १ कोटी २२ लाख ९५ हजार रूपयांचा दंड असा एकूण १ कोटी ३२ लाख ७८ हजार ६०० रूपये दंड आकारण्यात येत असून तो एका आठवड्यात शासनजमा करावा, असे निर्देश देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला ११ मे रोजीच्या नोटीसमध्ये दिले आहेत.