शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

येरमनार येथे ‘पेन करसड जत्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:32 IST

अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील पेरमिलीपासून १० किमी अंतरावर असलेल्या येरमनार गावात दर तीन वर्षांनी आदिवासी बांधवांच्या वतीने पेन करसळ जत्रा भरविली जाते. यंदाही सलग तीन दिवस ही जत्रा उत्साहात भरली.

ठळक मुद्देभाविकांचा जनसागर उसळला : आदिवासी संस्कृतीचे घडले दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : अहेरी तालुक्यातील अतिसंवेदनशील पेरमिलीपासून १० किमी अंतरावर असलेल्या येरमनार गावात दर तीन वर्षांनी आदिवासी बांधवांच्या वतीने पेन करसळ जत्रा भरविली जाते. यंदाही सलग तीन दिवस ही जत्रा उत्साहात भरली.अहेरी उपविभागासह छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने या जत्रेला आले होते. तीन दिवस चालणाºया या जत्रा उत्सवातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. पेन करसड म्हणजे देवीदेवतांच्या खेळण्याचा उत्सव होय. या उत्सवासाठी येरमनार परिसरातील आदिवासी समाजबांधव लोकवर्गणी गोळा करतात. उत्सवाच्या प्रारंभी भूमीया, पेरमा या गावपुजाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी कैैलास कोरेत, येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, पेरमिलीचे सरपंच अमोल आत्राम, विठूजी मेश्राम, देवाजी सडमेक, लक्ष्मण कुळमेथे, रामा आत्राम, गावपाटील इंदरशाह आत्राम, विजय आत्राम, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, सूरज आत्राम आदी उपस्थित होते.सदर उत्सवादरम्यान धार्मिक संस्कृतीतून आदिवासी समाजाची संघटन शक्ती दिसून आली. तसेच विशेष पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर ढोल, पाईनग, कुळडी, तकलस या पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी समाज बांधवांनी रेलानृत्य केले. सदर तीनदिवसीय जत्रेत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अहेरी उपविभागातील आदिवासी समाजातर्फे अशाप्रकारचे धार्मिक उत्सव आजही साजरे केले जातात.