शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जवसुली ७३ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:47 IST

दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १५ हजार ३५२ सभासद शेतकºयांना ४९ कोटी ३३ लाख २१ हजार रूपयाच्या पीक कर्जाचे वाटप केले.

ठळक मुद्देजिल्हा बंँकेची आघाडी : ११ हजार ३६० शेतकऱ्यांनी भरले ३६ कोटी १६ लाख

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १५ हजार ३५२ सभासद शेतकºयांना ४९ कोटी ३३ लाख २१ हजार रूपयाच्या पीक कर्जाचे वाटप केले. आतापर्यंत सदर बँकेने ११ हजार ३६० सभासद शेतकºयांकडून ३६ कोटी १६ लाख ९६ हजार ५१५ रूपयांच्या पीक कर्जाची वसुली केली आहे. पीक कर्ज वसुलीची टक्केवारी ७३.३२ आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५५ शाखा आहेत. सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हा बँकेने १५ हजार ३५२ शेततकºयांना सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत एकूण ४९ कोटी ३३ लाख २१ हजार रूपयांचे पीक कर्ज वाटप केले. २० मार्चपर्यंत ११ हजार ३६० शेतकरी सभासदांनी ३६ कोटी १६ लाख रूपयांच्या पीक कर्जाचा भरणा केला. या शेतकºयांना महाराष्टÑ शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा लाभ मिळाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांच्या हाती अत्यल्प उत्पादन आले असले तरी जिल्ह्यातील शेतकºयांकडून कर्ज वसुलीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी २९ व ३० मार्चला जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार असल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्हा बँकेने कोरची तालुक्यातील ६०० शेतकºयांना १ कोटी ६१ लाख ५१ हजार, कुरखेडा तालुक्यातील २ हजार ३९ शेतकºयांना ६ कोटी ४० लाख २१ हजार, देसाईगंज तालुक्यातील ६२३ शेतकºयांना १ कोटी ९३ लाख ७१ हजार, धानोरा तालुक्यातील शेतकºयांना २ कोटी ८८ लाख ४४ हजार, आरमोरी तालुक्यातील शेतकºयांना ५ कोटी ३५ लाख ८२ हजार, गडचिरोली ५ कोटी ८० लाख व चामोर्शी तालुक्यात १६ कोटी २४ लाख रूपये पीक कर्ज वाटप केले.वसुलीत कोरची, अहेरी तालुका आघाडीवर२०१७-१८ च्या पीक कर्ज वसुलीत कोरची व अहेरी तालुक्याने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत कोरची तालुक्यात जिल्हा बँकेने ७७.४३ टक्के तर अहेरी तालुक्यात ७७.१८ टक्के पीक कर्ज वसुली झाली आहे. कुरखेडा तालुका ७०.५५ टक्के, देसाईगंज ६५.८९, धानोरा ७४.०१, आरमोरी ६८.४८, गडचिरोली ७३.३६, चामोर्शी ७५.४७, मुलचेरा ७५.९७, भामरागड ७६.६९, एटापल्ली ७४.८४ तर सिरोंचा तालुक्यात ७१.७४ टक्के वसुली आहे३१ मार्च २०१८ पर्यंत पीक कर्जाचा भरणा केलेल्या शेतकºयांना शुन्य टक्के व्याज दराचा लाभ मिळणार आहे. १ एप्रिलपासून पीक कर्ज वितरित करण्यात येणार आहे. सभासद शेतकºयांनी शुन्य टक्के व्याजदराचा लाभ घ्यावा.- सतीश आयलवार, सीईओ, जीडीसीसी बँक गडचिरोली