शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्डल मार्चमधून शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:15 IST

कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे गेल्या १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. माओवाद्याच्या या हिंसक भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ १५ मे रोजी बुधवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून मुख्य मार्गाने कॅन्डल मार्च काढण्यात आला.

ठळक मुद्दे१५ शहीद जवानांना श्रद्धांजली : विविध सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे गेल्या १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले. माओवाद्याच्या या हिंसक भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ १५ मे रोजी बुधवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून मुख्य मार्गाने कॅन्डल मार्च काढण्यात आला. यात पोलीस अधिकाऱ्यांसह जवान, विविध संघटनांचे प्रतिनिधी व महिला सहभागी झाल्या होत्या.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, डॉ.मोहीतकुमार गर्ग, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते. या कँडल मार्चमधून शांततेचा संदेश देत नक्षली कृत्याचा निषेध नोंदविण्यात आला.१ मे रोजी कुरखेडा येथे शिघ्रकृती दलाचे जवान कर्तव्यावर जात असताना जांभुळखेडा-पुराडा मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला.हिंसक माओवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस विभाग व विविध सामाजिक संघटनांनी या कॅन्डल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी प्रामुख्याने सायकल स्नेही मंडळ व शहीद पोलीस जवानांच्या महिला संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.या मार्चदरम्यान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह इतर पोलीस जवान व महिलांनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात मेणबत्त्या लावून शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.