शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

पेसा कायदा हा दुधारी शस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:25 IST

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे, २४ डिसेंबर १९९६ मध्ये पेसा कायदा अंमलात आणला. या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा आदिवासी समाजाच्या विकासासाठी व गावकल्याणासाठी दुधारी शस्त्र आहे,......

ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांचे प्रतिपादन : धानोरात पेसा व वनहक्क कायद्यावर महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे, २४ डिसेंबर १९९६ मध्ये पेसा कायदा अंमलात आणला. या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा आदिवासी समाजाच्या विकासासाठी व गावकल्याणासाठी दुधारी शस्त्र आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.धानोरा तालुक्यातील सर्व ग्रामसभा व धानोरा तालुका ग्रामसभा महासंघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी अनुसूचित क्षेत्रातील पेसा व वनहक्क कायदा दिवसानिमित्त तालुका महोत्सव येथील माँ दंतेश्वरी देवस्थान परिसरात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोराचे माजी जमिनदार दौलतशहा मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, पं.स. सभापती अजमन राऊत, उपसभापती अनुसया कोरेटी, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, प्रकाश महाराज काटेंगे, माजी जि.प. सदस्य शांता परसे, काशिराम टेकाम, नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, नगसेविका रेखा हलामी, गीता वालको, मंगला मडावी, माधव गोटा, दौलत धुर्वे, केसरी उसेंडी, गाव पुजारी गणू जांगी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, पेसा कायद्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक आर्थिक स्तर उंचावलेला असून राजकारणातील पुढील दिशा दर्शविणारा कायदा आहे. आदिवासी मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी आमदार डॉ. होळी म्हणाले, ग्रामसभेचा अध्यक्ष हा गावाचा विकास करणारा व्यक्ती असला पाहिजे. त्याचा कार्यकाळ तीन वर्ष असावा. विकास पुरूष अध्यक्ष राहिल्यास पेसा कायद्याच्या अंमलबजावणीतून गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. पेसा क्षेत्रातील ग्रामसभा कोट्याधीश होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे डॉ. होळी यावेळी म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव गोटा, संचालन सुरेश चौधरी यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी पेसा कायद्यातील तरतूदी व ग्रामस्थांनी स्वीकारावयाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. महोत्सवाला धानोरा तालुक्यातील सर्व ग्रामसभांचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन ग्रामसभांनी घडविले.