शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांच्या हिंसक घटनांनी दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मागील एक महिन्यापासून नक्षलवाद्यांनी विविध हिंसक घटना घडविल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात दहशतीचे वातावरण ...

ठळक मुद्देठिकठिकाणी टाकली पत्रके : २० दिवसांपासून कारवाया वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील एक महिन्यापासून नक्षलवाद्यांनी विविध हिंसक घटना घडविल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेंदूपत्त्याच्या हंगामावरही नक्षल्यांच्या दहशतीचा परिणाम झाला आहे.महाराष्ट्र दिनाच्या रात्री नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील डांबर प्लान्टवरील २७ वाहनांना आग लावली. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या १५ पोलीस व एक वाहन चालकालाही लक्ष्य करण्यात नक्षलवादी यशस्वी झाले. या घटनानंतर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. एटापल्ली, भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर बांधून तसेच नक्षलपत्रके टाकून सरकार व पोलिसांवर टिका केली आहे. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचा अंदाज यायला लागला असतानाच नक्षलवादी पुन्हा आक्रमक झाले आहेत.१९ मे रोजी नक्षलवाद्यांनी बदंचे आवाहन केले होते. सदर बंद यशस्वीकरण्यासाठी नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील कुरंडी रिठ व चिपरी तसेच एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली येथील लाकूड बिटांना आग लावली. या दोन्ही ठिकाणी नक्षल बॅनर बांधले. बंदच्या दिवशी तेंदूपत्ता संकलन न करण्याचे आवाहन केले होते. नक्षल्यांच्या दहशतीने घाबरलेल्या ग्रामस्थांनी १९ मे रोजी तेंदूपत्त्याचे संकलन सुध्दा बंद ठेवले.तेंदूपत्ता संकलनासाठी ग्रामीण भागातील नागरिक दुर्गम भागात जातात. मात्र नक्षल्यांच्या या दहशतीमुळे काही मजूर तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम अर्धवट सोडून घराकडे परत येत आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन कमी होण्याची शक्यता आहे.नक्षल बंदचा गावकऱ्यांकडून तीव्र विरोधगडचिरोली : नक्षल्यांकडून १९ मे रोजी बंद पाळण्यात आला होता. यादरम्यान नक्षलवाद्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा दुर्गम भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली परिसरातील नागरिकांनी नक्षल बॅनरची होळी सुध्दा केली. यावरून नागरिकांमध्ये नक्षलवाद्यांविषयी चिड आहे. मात्र उघडपणे ते विरोध करू शकत नाही.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी