शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

धानपिकावर किडीचा हल्ला

By admin | Updated: September 3, 2014 23:24 IST

मागील दिड महिन्यापासून सुरू असलेला अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण तसेच प्रखर सुर्यप्रकाश यामुळे धानपिकावर गादमाशी, पाने गुंडाळणारी अळी व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

गडचिरोली : मागील दिड महिन्यापासून सुरू असलेला अनियमित पाऊस, ढगाळ वातावरण तसेच प्रखर सुर्यप्रकाश यामुळे धानपिकावर गादमाशी, पाने गुंडाळणारी अळी व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. सुधीर बोरकर यांनी केले आहे. धानावर येणाऱ्या लष्करी अळीला स्पोडोप्टेरा मॉरिशिया असे संबोधले जाते. या अळीचा पतंग १ ते २ सेमी लांब आकाराचा राहतो. या अळ्या लष्कराप्रमाणे हल्ला करून शेतातील पीक फस्त करतात. या अळ्या रात्री कार्यक्षम राहत असून दिवसा धानाच्या बेचक्यात किंवा बांधावरील गवतामध्ये लपून बसतात. या अळ्या कडेकडून पाने कुरतडतात. या अळीच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी ५० मिली किंवा सायपरमेथ्रीन २५ ईसी, ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.गादमाशीचा प्रादुर्भावर रोपवाटीकेतूनच सुरूवात होते. या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अधिक प्रमाणात आढळून येतो. उशिरा केलेले धान, ढगाळलेले वातावरण, रिमझिम पाऊस, ८० ते ९० टक्के वातावरणातील आद्रता या किडीच्या वाढीस अतिशय पोषक ठरते. या किडीची प्रौढ माशी डासासारखी दिसते. रंग तांबडा व पाय लांब असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी धानाच्या मुख्य पोडात शिरून बुंध्याजवळ स्थिरावते. त्यावरच ती उपजिवीका करते. त्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता. नळी अथवा चंदेरी पोंगा तयार होतो. या किडीच्या बंदोबस्तासाठी फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो किंवा क्विनॉलफॉस ५ टक्के दाणेदार १५ किलो प्रति हेक्टरी याप्रमाणात बांधीमध्ये ५ ते १० सेमी पाणी असतांना नियंत्रणाकरीता वापरावे. पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या पंखावर काळी नागमोडी नक्षी असते. ही अळी नेहमी पानाच्या गुंडाळीत राहते. या अळीच्या बंदोबस्तासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १० मिली किंवा मॅलॅथिआॅन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा फेनिट्रोथिआॅन ५० टक्के प्रवाही १० मिली लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. धानावर हिरवे, पांढरे व तपकिरी असे तीन प्रकारचे तुडतुडे दिसून येतात. या तुडतुड्यांच्या बंदोबस्तासाठी मोनोक्रोटाफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मिली किंवा फेनिट्रोथिआॅन ५० टक्के प्रवाही ३० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डोंगराळ भागात भरपूर दमट व थंड हवा मिळत असल्याने या रोगाची वाढ भरपूर प्रमाणात होते. हा रोग बुरशी पासून तयार होतो. पानावर व पेऱ्यावर तांबूस, निळसर, राखडी रंगाचे ठिबके दिसून येतात. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी कॉर्बेंडाझीम १० गॅ्रम किंवा हिमोसान ६ मिली किंवा कॉपन आॅक्झीक्लोरॉईड २५ ग्रॅमची फवारणी करावी असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. सुधीर बोरकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)