शहरं
Join us  
Trending Stories
1
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
2
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
6
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
7
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
8
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
9
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
10
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
11
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
12
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
13
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
14
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
15
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
16
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
17
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
18
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
19
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
20
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

जीवावर उदार हाेऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ३५० रूपये दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:39 IST

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रूग्णांचा आकडा चार हजार पर्यंत गेला हाेता. एवढ्या रूग्णांना सेवा देऊ शकेल एवढी आराेग्य ...

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय काेराेना रूग्णांचा आकडा चार हजार पर्यंत गेला हाेता. एवढ्या रूग्णांना सेवा देऊ शकेल एवढी आराेग्य यंत्रणा जिल्ह्यात नसल्याने काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत नेमणुक करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये जवळपास १०० कर्मचारी कंत्राटी तत्वावर नेमण्यात आले आहेत. काेराेना हा अतिशय संसर्गजन्य राेग आहे. लागण झालेल्या अनेकांचा जीव या राेगामुळे गेला आहे. त्यामुळे समाजमनावर या राेगाविषयी एक प्रकारची भीती आहे. या रूग्णांना सेवा देण्याचे काम हे कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. मात्र दिवसाला केवळ ३५० रूपये एवढेच मानधन दिले जाते.

बाॅक्स

पाेट भरेल एवढे पैसे द्या

-काेराेनाची भीती साऱ्या जगाने घेतली आहे. काेराेनाचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह येताच सख्खे नातेवाईकही परक्याप्रमाणे वागू लागतात. अशा स्थितीत त्यांना सेवा देण्याचे काम आमच्याकडून हाेते. अतिशय जाेखमीचे काम असल्याने त्यासाठी पाेट भरेल एवढे तरी मानधन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ३५० रूपयेच हातात दिले जातात.

- कंत्राटदाराने १२ हजार रूपये मानधन देण्याचा करार केला आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ९ ते १० हजार रूपये एवढेच मानधन दिले जाते.

बाॅक्स

काय काम करावे लागते

काेराेना मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव प्लास्टीकमध्ये सील बंद करणे. हे शव शववाहिकेपर्यंत पाेहाेचविणे. आराेग्य कर्मचाऱ्यांना मदत करणे. एखादा रूग्ण ऑक्सिजनवर असेल तर त्याला मदत करणे. आदी कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात.

काेट

काेराेनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला सेवा देण्याचे धाेकादायक काम आमच्याकडून करवून घेतले जाते. त्यासाठी किमान २० हजार रूपये मासिक मानधन मिळणे अपेक्षित हाेते. मात्र १२ हजार रूपये मानधन रूपये देण्याचा करार केला आहे. प्रत्यक्षात केवळ ९ ते १० हजार रूपये एवढेच मानधन दिले जात आहे.

- कंत्राटी कर्मचारी

काेराेनाच्या काळात राेजगार नसल्याने नाईलाजास्तव हा राेजगार स्वीकारावा लागला आहे. आठ तास राबवून घेतले जाते. विशेष म्हणजे केेवळ तीनच महिन्यासाठी राेजगार आहे.

-कंत्राटी कर्मचारी

कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांची संख्या- ९७

दिवसाला मंजूर मजुरी-४००

कामाचे कंत्राट- ३ महिने