शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील एकमेव पेपरमिल उद्योग गुंडाळण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 05:00 IST

सध्या हे युनिट बंद असल्याने बऱ्याच रोजंदारी कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले, तर स्थायी कामगारांना बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. बी.जी.पी.एल. युनिट आष्टी येथे ए-४ साइज पेपर कटिंग मशीन ठेवण्यात आली होती. त्यामुळे काही कर्मचारी या ठिकाणी काम करीत होते. आता ती मशीनही स्थलांतरित करण्यात आल्याने पेपर मिल कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

सुधीर फरकाडेलाेकमत न्यूज नेटवर्क आष्टी : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आष्टी-इल्लूर येथे असलेली पेपरमिल २०१६पासून बंद पडलेली आहे. पाच वर्षांपासून उत्पादन बंद असताना आता हळूहळू काही मशिनरी बल्लारपूर येथील पेपरमिलमध्ये स्थानांतरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही पेपर मिल पुन्हा सुरू न करता येथील युनिट गुंडाळण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येते. आधीच उद्योगधंद्याची मारामार असलेल्या या जिल्ह्यात यामुळे कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. सध्या हे युनिट बंद असल्याने बऱ्याच रोजंदारी कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले, तर स्थायी कामगारांना बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. बी.जी.पी.एल. युनिट आष्टी येथे ए-४ साइज पेपर कटिंग मशीन ठेवण्यात आली होती. त्यामुळे काही कर्मचारी या ठिकाणी काम करीत होते. आता ती मशीनही स्थलांतरित करण्यात आल्याने पेपर मिल कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे. आष्टी येथे १९८७ मध्ये एकमेव पेपरमिल उद्योग सुरू झाला होता. पेपरमिल कंपनीने आष्टी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने ताब्यात घेऊन स्थायी नोकरी देण्याच्या करारनाम्यावर विकत घेतल्या. परंतु जमिनी दिलेल्या स्थानिकांना अस्थायी नोकरी दिली. आता अस्थायी कामगारांना वेठीस धरून हळूहळू मिल बंद करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. 

उद्योगामुळे बाजारपेठेस होती भरभराट आष्टी येथे पेपरमिल उभारली गेली तेव्हा येथील मार्केट चांगले तेजीत होते. या पेपरमिल मध्ये काम करणारे कामगार आष्टी येथील बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात खरेदी करीत होते. आष्टी गावाची या पेपरमिलमुळे एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती. आता पेपर मिल बंद केल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून, अनेकांना अप्रत्यक्षपणे मिळालेला रोजगारही गेला आहे. 

बल्लारपूर पेपरमिलमध्ये सामावून घ्या आष्टीचे युनिट कायमस्वरूपी बंद केले जाणार असल्यास या युनिटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना बल्लारपूर पेपरमिल मध्ये सामावून घेण्यात यावे किंवा येथील कामगारांना स्वेच्छानिवृत्तीच्या नियमाप्रमाणे मोबदला द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे. त्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्यामार्फत शासनाकडे निवेदनही दिले. त्यावर आता निर्णय होतो याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी