शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मेळाव्यात एक हजार रूग्णांची तपासणी

By admin | Updated: March 24, 2017 01:07 IST

उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे गुरूवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान व उपजिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

उपजिल्हा रूग्णालयाच्या पुढाकारातून शिबिर : व्यसन सोडण्याचे नगराध्यक्षांचे आवाहनकुरखेडा : उपजिल्हा रूग्णालय कुरखेडा येथे गुरूवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान व उपजिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान दिवसभरात एक हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिराचे उद्घाटन कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, नगर पंचायत आरोग्य सभापती आशा तुलावी, बांधकाम सभापती संतोष भट्टड, पाणी पुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, रूग्ण कल्याण समितीचे सदस्य धरमदास उईके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, मनोज सिडाम, पं.स. सदस्य श्रीराम दुगा, आरमोरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गवई, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश दामले, परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक मनिष नंदनवार, डॉ. धुर्वा, डॉ. सावसागडे यांच्यासह दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय सावंगी येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू उपस्थित होती. यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी यांनी समाजात व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. व्यसनामुळे आरोग्याचे मोठे नुकसान होत आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दात व मुख रोगांमध्ये वाढ झाली आहे. व्यसनाधिनतेला विरोध करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपचंद सोयाम, संचालन डॉ. जनबंधू व श्यामला कुंबळे तर आभार राहूल भुरडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)