शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्याच्या नगरीत कार्यालय ओस

By admin | Updated: December 30, 2014 23:36 IST

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र पालकमंत्री अहेरी भागातील असतानाही या भागात शासकीय कार्यालय कर्मचाऱ्याअभावी सध्या

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र पालकमंत्री अहेरी भागातील असतानाही या भागात शासकीय कार्यालय कर्मचाऱ्याअभावी सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. अहेरी उपविभागातील आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. लेखा विभाग वगळता भांडार, यांत्रिकी, संगणक, प्रशासन आदी विभागात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नव्हती. विजेचे दिवे व पंखे मात्र सुरू होते. हे कार्यालय पूर्णत: रामभरोसे सुरू असल्याचे चित्र दिसून आले.या संदर्भात कार्यकारी अभियंता यांना विचारणा करण्यासाठी मंगळवारी प्रयत्न करण्यात आला. तर त्यांनी कर्मचारी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर येथून येत असल्याने ते सोमवारी उशीरा येतात, असे सांगून या कर्मचाऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. अहेरी भागाचे आमदार राज्याचे मंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांच्या मतदार संघात जर कार्यालयाची अशी अवस्था असेल तर तर जिल्ह्याच्या अन्य कार्यालयाचा विचार न केलेलाच बरा, अशी भावना या परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात बायोमॅट्रीक थंबमशीन देण्यात आली आहे. मात्र ती धुळखात आहे. त्यामुळे कर्मचारी वाटेल तेव्हा येतात व वाटेल तेव्हा जातात, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)