शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महामाेर्चा निघणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST

गडचिराेली : काेराेनाचे कारण पुढे करीत पाेलीस प्रशासनाने माेर्चाला परवानगी देण्यास नकार दिला असला तरी २२ तारखेचा नियाेजित माेर्चा ...

गडचिराेली : काेराेनाचे कारण पुढे करीत पाेलीस प्रशासनाने माेर्चाला परवानगी देण्यास नकार दिला असला तरी २२ तारखेचा नियाेजित माेर्चा निघेलच, असा निर्धार १४ फेब्रुवारी राेजी पार पडलेल्या ओबीसी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत व्यक्त केला आहे. २२ तारखेचा ओबीसींचा माेर्चा ऐतिहासिक व्हावा, यासाठी ओबीसी समाज संघटना मागील १५ दिवसापासून कामाला लागली आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन केले जात आहे. माेर्चाला परवानगी मिळावी, यासाठी पाेलीस प्रशासनाकडे अर्ज केला हाेता. मात्र पाेलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ओबीसी समाजात माेर्चाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. माेर्चा निघणार की नाही, याविषयी शंका-कुशंका उपस्थित केल्या जात हाेत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ओबीसी समन्वय समितीची तातडीची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत माेर्चाविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच सदस्यांनी माेर्चा निघेलच, असा सर्वानुमते निर्णय घेतला. माेर्चा अतिशय शांततेत काढला जाईल, माेर्चेकरी काेराेना प्रतिबंधाविषयीचे नियम पाळतील. यादृष्टीने प्रयत्न केले जातील. शांततेच्या मार्गाने सरकारला ओबीसी समाजाची ताकद, ऐक्य दाखवायचे आहे. त्यादृष्टीने सर्व ओबीसी बांधवांनी मनात काेणतीही शंका न बाळगता माेर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीच्या सदस्यांनी केले आहे.

बाॅक्स ......

शेतकरी माेर्चालाही परवानगी नाही

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काेणत्याच माेर्चाला परवानगी देत नाही. एवढेच नाही तर दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या माेर्चालासुद्धा परवानगी नाही, तरीही हा माेर्चा मागील महिनाभरापासून सुरू आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या कालावधीत एकाही माेर्चाला परवानगी नव्हती. तरीही हजाराेच्या संख्येतील माेर्चे काढण्यात आले आहेत. एकाही माेर्चेकऱ्यावर प्रशासनाने कारवाई केली नाही. उलट पाेलीस बंदाेबस्त ठेवून माेर्चा शांततेत पार पडेल, यासाठी सहकार्य केले असल्याचे दिसून येते. ओबीसी समाज संघटनेने माेर्चाची परवानगी मागितली हाेती. त्याला उत्तर म्हणून प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. हा एक नियमाचा भाग आहे. मात्र याला ओबीसी समाजाने घाबरून जाऊ नये. पाेलीस विभाग व इतर विभागसुद्धा माेर्चा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करतील, अशी अपेक्षा बैठकीतील सदस्यांनी व्यक्त केली आहे.